पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही; खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव: भाजप सोडण्याच्या वेदना आहेत. पण माझ्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांसोबत राहण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी भाजपचा त्याग केला असून मी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कुणीही मला फोन केला नाही. कुणीही माझी मनधरणी केली नाही, असा दावा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे खडसेंनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून […]

पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही; खडसेंचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 2:32 PM

जळगाव: भाजप सोडण्याच्या वेदना आहेत. पण माझ्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांसोबत राहण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी भाजपचा त्याग केला असून मी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कुणीही मला फोन केला नाही. कुणीही माझी मनधरणी केली नाही, असा दावा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे खडसेंनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून त्यांची अनेकदा मनधरणी केली असल्याचा भाजप नेत्यांनी केलेला दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. (only chandrakant patil contact me before my resignation says eknath khadse)

भाजपचे ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप सोडल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मला फोन करून पक्ष सोडू नये म्हणून मनधरणी केली. त्याशिवाय एकाही नेत्याने साधा फोनही केला नसल्याचं खडसे यांनी सांगितलं. भाजपचे नेते आणि जळगावमधील आमदार गिरीश महाजन यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याचंही ते म्हणाले.

तर राजकारणातून संन्यास घेईल

माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. पण हे आरोप कोणत्याही राजकीय पक्षाने केले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी ही केली नाही. विधिमंडळातील कामकाजाचं इतिवृत्त काढून पाहा. त्यातून तुम्हाला दिसून येईल. एकाही पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केल्याचं मला दाखवून दिलं तर मी राजकारणातून तात्काळ संन्यास घेईल, असं आव्हानही त्यांनी दिलं. (only chandrakant patil contact me before my resignation says eknath khadse)

फडणवीसांवरील नाराजीतून राजीनामा

मी कधीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली नाही. केंद्रीय नेतृत्वावर आणि प्रदेश भाजपवर मी नाराज नाही. फक्त देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात खालच्या स्तरावर राजकारण केलं. त्यामुळे मी भाजपचा राजीनामा दिला आहे. केवळ फडणवीसांवरील नाराजीतून हे पाऊल उचललं आहे, असंही ते म्हणाले.

विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांचा फोन

एका महिलेने माझ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ती महिला मुंबईत होती. मुंबई मुक्ताईनगरमध्ये होतो. माझ्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून फडणवीसांनी स्वत: पोलिसांना फोन केला. त्यावर मी फडणवीसांना विचारलं असता ती बाई खूप अकांडतांडव करत होती. मीडियाने ती बातमी चालवली असती म्हणून पोलिसांना फोन केला असं फडणवीस म्हणाले. मला आयुष्यातून उठवण्याचा हा प्रयत्न होता. या खटल्यातून मी 15 दिवसांपूर्वीच बाहेर पडलो आहे. या खोट्या गुन्ह्यात मी तीन वर्षे आत गेलो असतो किंवा आयुष्यभर ही बदनामी सहन करावी लागली असती. फडणवीसांमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

भाजपवर रोष नाही, मी फडणवीसांमुळे पक्ष सोडतो, एकनाथ खडसेंचा घणाघात

फडणवीसांच्या छळाला कंटाळून भाजपला राम-राम, एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल

…तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेन, भाजप राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान

(only chandrakant patil contact me before my resignation says eknath khadse)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.