Devendra Fadnavis: मुंबईला कुठं नेऊन ठेवलं तुम्ही, फडणवीसांचा आकडेवारीसह ठाकरेंना सवाल, पिंपरी चिंचवड, नागपूर, पुण्याचा दाखला

पाच कोविड सेंटरचे 100 कोटीचं कंत्राट पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिलं. कागदपत्र चार दिवसांत तयार केली गेली. रेप्युटेड कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावं दिली गेली. पण स्टॅम्प पेपर जुने, त्यात काटछाट केली गेलीय. अनुभव नसलेल्या लोकांना काम द्यायचं. त्या ठिकाणी रुग्ण आला की नाही त्याला 50 टक्के रक्कम दिली गेली.

Devendra Fadnavis: मुंबईला कुठं नेऊन ठेवलं तुम्ही, फडणवीसांचा आकडेवारीसह ठाकरेंना सवाल, पिंपरी चिंचवड, नागपूर, पुण्याचा दाखला
मुंबईला कुठं नेऊन ठेवलं तुम्ही, फडणवीसांचा आकडेवारीसह ठाकरेंना सवाल
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 5:49 PM

मुंबई : मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिके (Mumbai Municipal Corporation)त जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंट (Financial Resource Management)चा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज विधानसभेत केली आहे. यावेळी फडणवीसांनी कोविड सेंटर घोटाळ्यांवरही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. (Opposition leader Devendra Fadnavis target Thackeray government over municipal Corporation budget and covind Center scam)

पुण्यातून 15 दिवसांत हाकललं त्यांनाच मुंबईत 5 कोविड सेंटरचं कंत्राट

पाच कोविड सेंटरचे 100 कोटीचं कंत्राट पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिलं. कागदपत्र चार दिवसांत तयार केली गेली. रेप्युटेड कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावं दिली गेली. पण स्टॅम्प पेपर जुने, त्यात काटछाट केली गेलीय. अनुभव नसलेल्या लोकांना काम द्यायचं. त्या ठिकाणी रुग्ण आला की नाही त्याला 50 टक्के रक्कम दिली गेली. कारण, आपल्यातलंच कुणाला तरी कोविड सेंटर देण्यात आली होती. दादा तुम्ही पुण्यातून 15 दिवसांत हाकललं त्यांनाच मुंबईत 5 कोविड सेंटरचं कंत्राट देण्यात आलं. पण त्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही. मुलुंड कोविड सेंटरचं काम आपण घाईगडबडीत दिलं. आपल्याच एकाच्या आशा कॅन्सर ट्रस्टला हे काम दिलं. माहिती घेतल्यावर कळालं त्याची कुठे नोंदच नाही. मग महिनाभरातच त्यांची पोलखोल झाली आणि 4 महिन्यात त्यांचं कंत्राट रद्द झालं.

मुंबई मेली तरी चालेल पण…

सफाई कामगाराच्या नावावर आपल्या तिजोऱ्या कशा भरल्या हे अमित साटम तुम्हाला व्यवस्थित सांगतील. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. यूएनने कौतुक केलं, कोर्टानं कौतुक केलं, पण हा भ्रष्टाचार, हे घोटाळे त्यांच्यासमोर जायला हवेत. मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे. यावर आम्ही बोललो तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू… म्हणजे मुंबईला लुटून खाणारे हितचिंतक दैवत.. आणि बोलणारे शत्रू? पण आता प्रत्येकाच्या लक्षात आलं आहे की कोण आपला शत्रू आहे? कोण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खातंय, असेही फडणवीस पुढे म्हणाले. (Opposition leader Devendra Fadnavis target Thackeray government over municipal Corporation budget and covind Center scam)

इतर बातम्या

Video: ‘तेच मूर्ख, तेच शहाणे’ आघाडी सरकारच्या कारभाराचे फडणवीसांकडून चपखल शब्दात वाभाडे !

Big News Ajit Pawar : यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही, अजित पवारांची सभागृहात मोठी घोषणा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.