काँग्रेसने सातत्याने ओबीसींवर अन्याय केला, म्हणून वडेट्टीवारांनी खदखद व्यक्त केली, प्रवीण दरेकरांचा टोला

ओबीसी असल्यामुळे कमी दर्जाचं खातं मिळालं, अशा आशयाचं वक्तव्य वडेट्टीवार यांनी या चिंतन शिबिरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर केलं. त्यावरुन आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वडेट्टीवारांना टोला लगावलाय.

काँग्रेसने सातत्याने ओबीसींवर अन्याय केला, म्हणून वडेट्टीवारांनी खदखद व्यक्त केली, प्रवीण दरेकरांचा टोला
प्रवीण दरेकर, विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 10:49 PM

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोणावळ्यात पार पडलेल्या ओबीसी चिंतन शिबिरात बोलताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खंत व्यक्त केलीय. आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदावरुन त्यांनी जाहीर सभेत पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलीय. आपण ओबीसी असल्यामुळे कमी दर्जाचं खातं मिळालं, अशा आशयाचं वक्तव्य वडेट्टीवार यांनी या चिंतन शिबिरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर केलं. त्यावरुन आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वडेट्टीवारांना टोला लगावलाय. (Praveen Darekar criticizes Vijay Vadettiwar’s statement on Ministry Allocation)

खातेवाटपावरुन वडेट्टीवार नाराज

ओबीसीचं खात भेटलं तेव्हा चपराशीही नव्हता. उधारीवर, समाज कल्याण विभागाच्या भरवशावर हे खातं चालवतो. ओबीसी खात्यातील जागा भरण्यासाठी पैसे नाही असं सांगितलं जातं. कार्यालयालाही जागा नाही, अशी खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय. त्याचबरोबर खातेवाटपावेळी काही दिवस रुसलो होतो. मग वाटलं चुकी झाली. विरोधी पक्षनेता होतो. ओबीसींची नेतृत्व करतो. वाटलं होतं महसूल खातं मिळेल. पण भेटलं हे खातं. ओबीसी आहे ना मी, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. महत्वाची बाब म्हणजे वडेट्टीवार यांनी आपली खंत बोलून दाखवली त्यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते.

वडेट्टीवारांचा दरेकरांना टोला

वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसवर टीका करताना वडेट्टीवारांनाही टोला लगावलाय. काँग्रेसनं ओबीसींवर सातत्याने अन्याय केला आहे. त्यामुळेच आज विजय वडेट्टीवार यांनी मनातील खदखद व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी 22 व्या क्रमांकाचं खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चांगला समन्वय असल्याच्या सांगणाऱ्या वडेट्टीवारांचं हे वक्तव्य पक्षांतर्गत धुसफूस दाखवणारं असल्याचा टोला दरेकर यांनी लगावलाय. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे, असं म्हणणाऱ्यांसाठी वडेट्टीवारांचं हे वक्तव्य एकप्रकारे चपराक असल्याची टीकाही दरेकरांनी केलीय.

“मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य, पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू”

विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे.

संबंधित बातम्या :

आम्ही निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही, काय करायचं ते करा : विजय वडेट्टीवार

ओबीसी चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं विचारमंथन, ओबीसी आरक्षणासाठीचे महत्वाचे ठराव, जाणून घ्या सविस्तर

Praveen Darekar criticizes Vijay Vadettiwar’s statement on Ministry Allocation

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.