Nawab Malik | घरुन उशी-गादी मागवली, ईडीच्या कोठडीत नवाब मलिकांची पहिली रात्र कशी गेली?
हसीना पारकर यांच्याकडून नवाब मलिक यांच्या नावावर मालमत्ता वर्ग, यामुळं ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई – बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांची घरी चौकशी केली, काही गोष्टीत ईडीला (ED) शंका आल्याने त्यांना तात्काळ नवाब मलिकांना ताब्यात घेतलं आणि दुपारी कार्यालयात आणलं. इक्बाल कासकर (ekbal kaskar) यांन नाव घेतल्याने नवाब मलिकांना चौकशीसाठी बोलावण्यातं आलं होतं. पण बुधवारी सकाळी घरी मलिकांवरती कारवाई केली. त्यानंतर जे. जे रूग्णालयात तपासणी करण्यासाठी नेण्यात आलं होतं. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी ईडीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केल्याची पाहायला मिळाले. तसेच भाजप ईडीचा चुकीचा वापर करीत असून हे सुडाचं राजकारण करीत असल्याचा आरोप उपस्थित अनेक समर्थकांनी तिथं नोंदविला. अटक झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर आज महाविकास आघाडीतील अनेक नेते मंत्रायलय परिसरात धरणं आंदोलन करणार आहेत. भाजपचे नेते आज दिवसभरात नवाक मलिकांचा राजीनामा घ्यावा यासाठी आंदोलन करणार आहे. काल रात्री उशिरा इडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांना त्यांना पाठीबा त्रास असल्याने उशी-गादी देण्यात आली होती. तसेच त्याचे कुटुंबिय अत्यंत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी अनेक ट्विट देखील केले आहेत.
राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचे आणखी उदाहरण आज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईतून दिसून आले.@nawabmalikncp @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @zee24taasnews @saamTVnews @LoksattaLive
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) February 23, 2022
महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे.. जय महाराष्ट्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2022
महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन
नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर सकाळपासूनचं महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी काल मलिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन केलं, तर भाजपचं हे असलं कारण चुकीचं असल्याचं अनेकांनी ट्विट म्हणाले आहेत. अनेक नेत्यांनी आमचं सरकार पाडण्यासाठी चुकीच्या पध्दतीने प्रयत्न केले जात असल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे आज होणा-या घडामोंडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी 10 वाजता मंत्रालयाशेजारी असणा-या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ अनेक मंत्री धरणं आंदोलन करणार आहेत.
केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे निंदनीय आहे. यातून संविधान व लोकशाही विरोधी काम होते.@nawabmalikncp @OfficeofNM
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 23, 2022
मलिकांना अटक केल्यानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया
नवाब मलिकांना अटक केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना 93 च्या बॉम्बस्फोटप्रकरणात बळी गेलेल्या सगळ्यांना श्रध्दांजली अर्पण करीत मालिकांविरोधात निदर्शन करावी असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजप केंद्रीय यंत्रणा चुकीच्या पध्दतीने हाताळत असून नवाब मलिकांनी ती जमीन 22 वर्षापुर्वी घेतली असल्याचे भूजबळांनी सांगितले त्याचबरोबर भाजप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना अटक करण्यासाठी कोणतीही कारण शोधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील भाजपची सत्ता संविधानाचा उपयोग चुकीच्या पध्दतीने करीत असून हे कुठं तरी थांबलं पाहिजे यासाठी सुप्रिम कोर्टानं राजकीय वापर थांबवावा असं म्हणटलंय. नवाब मलिकांबाबत तुम्हाला अधिक माहिती कोर्टात मिळेल, राजकीय बदल्याची भावना यातून दिसून आल्याचे शिवसेने खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचे आणखी उदाहरण आज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईतून दिसून आले.@nawabmalikncp @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @zee24taasnews @saamTVnews @LoksattaLive
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) February 23, 2022
कोर्टात काय झालं
मलिकांना अटक केल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला तर, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला असल्याचे पाहायला मिळाले. ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल केल्याचे अनिल सिंग यांच्याकडून कोर्टात सांगण्यात आले. हसीना पारकर यांच्याकडून नवाब मलिक यांच्या नावावर मालमत्ता वर्ग, यामुळं ईडीकडून पीएमएलएच्या कलम 19 द्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय, तसेच 55 लाखांची रक्कम यासाठी देण्यात आली होती. नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तिवाद केला, त्यानंतर त्यांना 3 मार्चनंतर ईडी कोठडी देण्यात आली.
Desai – This country is surviving only because of the rule of law. If we fail in that we have nothing to lose.
It will be unfair if he goes to jail today. #NawabMalik
— Live Law (@LiveLawIndia) February 23, 2022