Osmanabad | कोरोनामुळे धाराशिव व संभाजीनगर नामांतर रखडले, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेंचा दावा
बाळासाहेबांचे नामंतरणाचे स्वप्न हे देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर पूर्ण होणार असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी काल केली होती. तुळजापूर येथे काल त्यांनी सहकुटुंब भवानी मातेचे दर्शन घेतले.
उस्मानाबाद | कोरोनामुळे धाराशिव व संभाजी नगर हे नामंतरण रखडले असल्याचा दावा शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी शिवसंपर्क अभियान दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असून खासदार सदाशिव लोखंडे, आमदार कैलास पाटील यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. पक्ष संघटन वाढाव व विकास कामे लोकांपर्यंत पोहचवली जात आहेत. शिवसैनिकात या शिवसंपर्क अभियान बाबत उत्साह आहे. यावेळी कोरोना काळामुळे उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) व औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhajinagar) हे नामकरण रखडले आहे मात्र ती शिवसेनेची भूमिका आहे आणि नामंतरण करणारच आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. कालच भाजप नेते नितेश राणे उस्मानाबादेत शहरांच्या नामांतरांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. बाळासाहेब ठाकरे यांची ही इच्छा भाजप पूर्ण करेल, असे ते म्हणाले होते. त्यालाच प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार लोखंडे यांनी हे वक्तव्य केलं.
काय म्हणाले सदाशिव लोखंडे?
उस्मानाबाद दौऱ्यावर असलेले शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, ‘ कोरोना काळामुळे उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण रखडले आहे मात्र ती शिवसेनेची भूमिका आहे आणि नामंतरण करणारच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. राणे आता भाजपात अचानक आले आहेत मात्र लवकरच मुख्यमंत्री धाराशिव व संभाजीनगर करतील असा विश्वास खासदार लोखंडे यांनी व्यक्त केला.नितेश राणे यांना माहित नसेल 2014 ते 2019 हा काळ युतीचा काळ होता, धाराशिव नावावर इतके प्रेम होते तर तो मुद्दा तेव्हाच मांडायला हवा होता असे लोखंडे म्हणाले.
नितेश राणे नामांतरावर काय म्हणाले होते?
उस्मानाबादचे धाराशिव तर औरंगाबादचे संभाजी नगर हे नामकरण उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सरकार करू शकणार नाही, नामंतरण हे ठाकरे यांच्या नशिबात नाही. बाळासाहेबांचे नामंतरणाचे स्वप्न हे देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर पूर्ण होणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी काल तुळजापूर येथे सांगत शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर नामांतरणाचा मुद्दा चर्चेत आला होता. नामंतरण हा शिवसेनेचा अजेंड्यावरील विषय आहे. शिवसेना पक्षप्रमुख उस्मानाबादचे धाराशिव लवकरात लवकर करतील अशी अपेक्षा उस्मानाबादकरांना आहे असे सांगत नामंतरण लवकर होईल असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला. शिवसंपर्क अभियानाला उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवात झाली असून यात शिवसैनिक सहभागी होत आहेत. नळदुर्ग येथील कार्यक्रमात नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे, सुधीर कदम, प्रवीण कोकाटे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
इतर बातम्या-