ज्या सीबीआय मुख्यालयाचं उद्घाटन केलं, त्याच इमारतीत चिदंबरम यांचा मुक्काम

2011 मध्ये पी चिदंबरम आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी इमारतीचं लोकार्पण केलं होतं. यावेळी कपिल सिब्बल, वीरप्पा मोईली, मल्लिकार्जुन खर्गे यांचीही उपस्थिती होती.

ज्या सीबीआय मुख्यालयाचं उद्घाटन केलं, त्याच इमारतीत चिदंबरम यांचा मुक्काम
Follow us
| Updated on: Aug 21, 2019 | 11:32 PM

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने (CBI headquarter) त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. यानंतर त्यांना सीबीआय मुख्यालयात (CBI headquarter) नेण्यात आलंय. विशेष म्हणजे गृहमंत्री असताना ज्या मुख्यालयाचं उद्घाटन पी चिदंबरम यांनी केलं होतं, त्याच मुख्यालयात त्यांना अटकेनंतर ठेवलं जाणार आहे. 2011 मध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला तत्कालीन पंतप्रधानांसह इतर मंत्रीही उपस्थित होते.

2011 मध्ये पी चिदंबरम आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी इमारतीचं लोकार्पण केलं होतं. यावेळी कपिल सिब्बल, वीरप्पा मोईली, मल्लिकार्जुन खर्गे यांचीही उपस्थिती होती.

दोन तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram arrested) यांना अटक करण्यात आली. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने चिदंबरम (P Chidambaram arrested) यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांना दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यानतंर सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणावर तातडीने सुनावणीस नकार देत शुक्रवारी सुनावणी ठेवली.

हायव्होल्टेज ड्रामा

पी चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. दहा मिनिटात निवेदनदेऊन चिदंबरम यांच्या घराकडे जाण्यासाठी निघाले. त्यातच सीबीआयची टीम काँग्रेस मुख्यालयात दाखल झाली. पण तोपर्यंत चिदंबरम निघून गेले होते.

वाचा – दिग्गजांना घाम फोडणारी ईडी नेमकी आहे तरी काय?

यानंतर सीबीआय टीमने चिदंबरम यांचा पाठलाग करत त्यांचं घर गाठलं. पण तिथे गेल्यानंतर सीबीआय टीमला अडवण्यात आलं. सुरक्षा रक्षकांनी गेट उघडण्यास नकार दिला. गेट न उघडल्यामुळे सीबीआय टीमने भिंतीवरुन उडी मारत घरात प्रवेश केला.

सीबीआयनंतर काही मिनिटातच ईडीचीही टीम दाखल झाली. ईडीच्या टीमसाठी गेट उघडण्यात आलं. जमाव वाढलेला पाहता दिल्ली पोलीसही दाखल झाले.

वाचा – गृहमंत्रीपद आणि सीबीआय… फक्त मंत्री बदलले

दोन तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पी चिंदबरम यांना अखेर ताब्यात घेण्यात आलं. त्यांना घराच्या बाहेर आणल्यानंतर कार्यकर्ते गाडीला आडवे झाले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवलं आणि चिदंबरम यांना चौकशीसाठी घेऊन गेले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.