Panchayat Samiti : पंचायत समितीत सर्वाधिक जागा अपक्षांकडे, भाजपपेक्षा काँग्रेस सरस, राष्ट्रवादी शेवटच्या स्थानी

पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

Panchayat Samiti : पंचायत समितीत सर्वाधिक जागा अपक्षांकडे, भाजपपेक्षा काँग्रेस सरस, राष्ट्रवादी शेवटच्या स्थानी
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना लोगो
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 4:31 PM

मुंबई : राज्यातील 6 जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर पंचायत समित्यांमध्ये अनपेक्षितरित्या काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेल्याचं पाहायला मिळत आहे. (Panchayat Samiti by-elections, Congress has the highest number of seats)

पंचायत समिती पोटनिवडणूक (144 जागा)

भाजप – 33 शिवसेना – 22 राष्ट्रवादी काँग्रेस – 16 काँग्रेस – 35 इतर – 38

कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी निवडणूक?

अकोला – 28 धुळे – 30 नंदुरबार – 14 नागपूर – 31 पालघर – 14 वाशिम – 27

Panchayat Samiti By Election Result

पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल

अकोला जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 04 शिवसेना – 05 काँग्रेस – 00 राष्ट्रवादी काँग्रेस – 00 इतर – 19

धुळे जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 15 शिवसेना – 03 काँग्रेस – 03 राष्ट्रवादी काँग्रेस – 05 इतर – 04

नंदूरबार जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 03 शिवसेना – 06 काँग्रेस – 01 राष्ट्रवादी काँग्रेस – 04 इतर – 00

नागपूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 06 शिवसेना – 00 काँग्रेस – 02 राष्ट्रवादी काँग्रेस – 21 इतर – 02

पालघर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 03 शिवसेना – 05 काँग्रेस – 02 राष्ट्रवादी काँग्रेस – 00 इतर – 04

वाशिम जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 02 शिवसेना – 03 काँग्रेस – 08 राष्ट्रवादी काँग्रेस – 05 इतर – 09

मतदारांनी काँग्रेसला साथ दिली – पटोले

सहा जिल्ह्यातील जनतेचे आभार आम्ही या जिल्हा परिषद, पंचायत समितीनिमित्त एक सुरुवात केली आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. काही ठिकाणी आम्ही संघटनात्मक मागे पडलो. तिथेही काही दिवसांत आम्ही काम करु. खरं तर आज भाजप देशातील वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई, संविधान विरोधी धोरण या सगळ्याला कांग्रेसच थांबवू शकतं हे लोकांनी मान्य केलंय. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे, असं पटोले म्हणाले.

लोकशाहीत जनता मोठी आहे. जनतेचा विश्वास सर्वात मोठा असतो. आमच्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करुन आम्ही जनतेसमोर जाऊ, असं मी म्हटलं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे. आज देश बरबाद होतोय. त्याविरोधात काँग्रेस लढत आहे. जिल्हा परिषदेत भाजप आमच्यापेक्षा पुढे आहे. मात्र पंचायत समितीत आम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, असं पटोले म्हणाले.

इतर बातम्या :

ZP Elections : भाजपला काँग्रेसच रोखू शकतं, नाना पटोलेंचा दावा; मतदानाच्या टक्केवारील भाजपचा आसपासही कुणी नाही, दरेकरांचं प्रत्युत्तर

Akola ZP Election Result : अकोल्यात शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना समान मतं, विजयी उमेदवार कोण? चिठ्ठीचा कौल कुणाला?

Panchayat Samiti by-elections, Congress has the highest number of seats

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.