Kangana Ranaut : ‘शिव्या कोण खातो? त्याला हटवून तुम्ही मुंबईवरुन…’, कंगनाचा निर्णय ‘या’ अभिनेत्याला नाही पटला

Kangana Ranaut : कंगना रनौतने राजकारणात प्रवेश केलाय. बॉलिवूडची ही प्रसिद्ध हिरॉइन हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. कंगना अनेक सामाजिक विषयांवर थेट भूमिका घेतली आहे. सुरुवातीपासून तिचा कल भाजपाकडे होते. भाजपाच्या तिकीटावर ती निवडणूक लढवतेय. कंगनाच्या राजकारणात उतरण्याला एका अभिनेत्याने विरोध केला आहे.

Kangana Ranaut : 'शिव्या कोण खातो? त्याला हटवून तुम्ही मुंबईवरुन...', कंगनाचा निर्णय 'या' अभिनेत्याला नाही पटला
Kangana Ranaut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 8:57 AM

पंचायत 3 वेबसीरीज रिलीज झालीय. ही सीरीज अनेकांना आवडली होती. दोन सीजननंतर पंचायत 3 कधी येणार? याची चाहते आतुरतेने प्रतिक्षा करत होते. तिसऱ्या सीजनमध्ये प्रह्लादचा रोल साकारणाऱ्या फैसल मलिकने आपल्या अभिनयाने सर्वांना जिंकून घेतलय. त्याच्या डायलॉग्सच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. टीव्ही 9 ने पंचायतमधील प्रह्लाद शी संवाद साधला. यावेळी फैसल मलिक अनेक मुद्यांवर बोलला. कंगना रनौतच्या राजकारणात उतरण्यावरही तो मोकळेपणाने बोलला.

फैसल मलिकने सांगितलं की, त्याने कंगना रनौतसोबत रिवॉल्वर रानी चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचा तो एग्जक्यूटिव प्रोड्यूसर होता. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंबलला गेल्याच त्याने सांगितलं. फैसल मलिक कंगनाबद्दल बोलताना म्हणाला की, “कंगना एक चांगली महिला आहे. आधी ती अशी नव्हती. पण आता असं वाटतं की, ती कोणी दुसरी व्यक्ती आहे. मला असं वाटतं की, एक्टरच काम एक्टिंग करणं आहे, त्याने तेच केलं पाहिजे. अन्य गोष्टींमध्ये पडू नये. तिची बहिण मला चांगली ओळखते. रंगोलीने आमच्यासोबत काम केलय. एक-दिड वर्ष ऑफिसमध्ये काम केलं. चांगला अनुभव होता”

समाजासाठी काही करु शकतो असं वाटत असेल, तर….

“कंगनाच्या एक्टिंगबद्दल प्रश्नच नाही. ती बेस्ट आहे. मला असं वाटत अभिनेत्री इतक्या मेहनतीने जे शिकलीय, त्यावर फोकस केला पाहिजे. कंगनाने अभिनय सोडू नये, अजून काम केलं पाहिजे” असं फैसल म्हणाला.राजकारणात प्रवेशाच्या मुद्यावर फैसल म्हणाला की, “एक्टर्सनी राजकारणात येऊ नये. राजकारणाच काम राजकारण्यांच आहे. तुम्हाला समाजासाठी आपण काही करु शकतो असं वाटत असेल, तर खासदार बनू नका. दुसर काहीतरी चांगलं करा” फैसलच्या मते, राजकारण एक असं क्षेत्र आहे, जिथे 24 तास सातही दिवस सक्रीय रहाव लागतं.

खरतर कार्यकर्त्यासाठी ती जागा

“पॉलिटिक्स एक 24 तासाचा जॉब आहे. त्यासाठी कार्यकर्ता वर्षानुवर्ष कोणाचा तरी कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. त्याला हटवून तुम्ही मुंबईच्या माणसाला घेऊन येता. त्यामुळे त्याचं मन मोडणं स्वाभाविक आहे. तो कार्यकर्ताच त्या भागात, त्या शहरात लोकांमध्ये वावरत असतो. पब्लिककडून शिव्या कोण खातो, कार्यकर्ता ना. मग, तुम्ही हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून कोणालातरी घेऊन येता. त्याला म्हणता खासदार बन. खरतर कार्यकर्त्यासाठी ती जागा आहे” असं फैसल म्हणाला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.