पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वर्चस्वाची लढाई! परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयात प्रशासक येणार?
परळीतील वैद्यनाथ महाविद्यालय हे कवळ बीड जिल्ह्यातील नाही तर मराठवाड्यातील नामवंत महाविद्यालयापैकी एक आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात हे महाविद्यालय होतं. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ते पंकजा यांच्या ताब्यात आलं. मात्र, या काळात महाविद्यालयात मोठा गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी धनंजय मुंडे यांच्या गटाकडून करण्यात आल्या.
परळी : राज्यात भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसंच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात सातत्याने संघर्ष आणि वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे. आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात (Vaidyanath College) प्रशासक येणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
परळीतील वैद्यनाथ महाविद्यालय हे कवळ बीड जिल्ह्यातील नाही तर मराठवाड्यातील नामवंत महाविद्यालयापैकी एक आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात हे महाविद्यालय होतं. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ते पंकजा यांच्या ताब्यात आलं. मात्र, या काळात महाविद्यालयात मोठा गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी धनंजय मुंडे यांच्या गटाकडून करण्यात आल्या.
दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप
वैद्यनाथ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये खासगी क्लासेस घेत आहेत, असे आरोप दोन वर्षांपूर्वी झाला. इतकंच नाही तर या संदर्भात थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयातील नोकर भरतीत सुद्धा अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र हा सगळा खटाटोप केवळ संस्था धनंजय मुंडे यांना ताब्यात घेण्यासाठी होत असल्याचा आरोप पंकजा मुंडे गटाकडून करण्यात येत आहे.
जवाहर एज्युकेशन संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी चौकशीसाठी 4 जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून ही समिती आपला अहवाल पंधरा दिवसांत विद्यापीठाकडे सादर करणार आहे. त्यामुळे मुंडे बंधु-भगिनीच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘विकासकामात राजकारण आडवे आणू नका’ धनुभाऊंचा पंकजाताईंना टोला
परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत विविध गावातील महत्वाच्या सुमारे 62 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल भूमीपूजन करण्यात आलं. कोविड निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पदाधिकारी आणि स्थानिकांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
‘केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत, केंद्र सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात व परळी मतदारसंघात आणखी विकास निधी खेचून आणावा, आम्ही त्यांचे स्वागत करू विकासाचे राजकारण करावे पण विकासाच्या कामात राजकारण आडवे आणू नये’, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना लगावला.
इतर बातम्या :