बहिणीची पाठ थोपटली, गळाभेट घेतली, वाद मिटला?; मुंडे भावाबहिणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बीडमध्ये राज्य सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते. पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना धनंजय मुंडे यांची स्तुती केली. तर धनंजय मुंडे यांनीही आपल्या भाषणात बहिणीची स्तुती करण्याची कोणतीच कसूर सोडली नाही. इतकेच नाही तर आम्ही दोघे मिळून बीडचा विकास करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

बहिणीची पाठ थोपटली, गळाभेट घेतली, वाद मिटला?; मुंडे भावाबहिणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 9:39 PM

बीड | 5 डिसेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय मतभेद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. दोघाही भावा-बहिणीने एकमेकांवर राजकीय टीका टिप्पणीही केली आहे. दोघेही निवडणुकीच्या मैदानात एकमेकांच्या समोरासमोरही आले आहेत. त्यामुळे मुंडे बहीण भाऊ पुन्हा कधीच एकत्र येणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, राजकारणाच्या पटलावरची गणितं बदलली आणि या बहीण -भावातील दुरावाही दूर झाला आहें. तसं चित्र आज बीडमध्ये पाहायला मिळालं. बीडकरांनी हे दृश्य याची देही याची डोळा पाहिलं. महाराष्ट्रानेही दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्याचं पाहिलं आणि सर्वांनाच हायसं वाटलं.

राज्य सरकारने बीडच्या परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पालकमंत्री धनंजय मुंडेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी परळीत आल्यावर आधी गोपीनाथ गडाला भेट दिली. सर्व नेत्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.

अन् बहिणीची पाठ थोपटली

सर्व नेते स्मृतीस्थळावर आल्याने पंकजा मुंडे यांनी प्रत्येकाचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केल्यानंतर पंकजा या धनंजय मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी पुढे सरसावल्या. धनंजय मुंडे यांना श्रीफळ देण्यासाठी पंकजा जाताच धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीची गळाभेट घेतली. बहिणीची पाठ थोपटली. त्यावेळी पंकजा मुंडेही भारावून गेलेल्या दिसल्या. दोघा भावाबहिणीची गळाभेट पाहून अनेकांना गहिवरून आले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळावरच कुटुंबातील हे दिलासादायक चित्र पाहून अनेकांना हायसं वाटलं. या निमित्ताने दोन्ही भावाबहिणीमधील दुरावा दूर झाल्याची चर्चाही रंगली होती.

म्हणून उकाडा वाढला

त्यानंतर शासन आपल्या दारीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं. पंकजा मुंडे यांच्या भाषणानेच या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मंचाकडे पाहत होते तेव्हा उकाडा होत होता. डिसेंबरच्या महिन्यात गर्मी का होत आहे, लक्षात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा एकत्र आले आहेत. त्याहीपेक्षा गर्मीचा पारा अधिक वाढला कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले आहेत.

मला मीडियाने विचारलं. ताई तुम्ही कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण आहे का? मी म्हटलं मंचावर विधानसभा सदस्य आहेत. संवैधानिक पदावरील लोक आहेत. पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी काम केलं. परळीची सेवा करताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा असं मनात वाटायचं. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा या कामाचं बीजारोपण केलं. धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.