राज्यात ‘बिगबॉस’चा शो; ड्रग्स प्रकरणावरून सरकारवर पंकजा मुंडेची टीका, फडणवीसांनाही लगावला अप्रत्यक्ष टोला

देशात सुरू असलेल्या राजकारणावरून पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करतानाच स्वपक्षाला देखील टोला लगावला आहे.

राज्यात 'बिगबॉस'चा शो; ड्रग्स प्रकरणावरून सरकारवर पंकजा मुंडेची टीका, फडणवीसांनाही लगावला अप्रत्यक्ष टोला
पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 8:02 AM

अहमदनगर – सध्या आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून देशात जोरदार राजकारण सुरू आहे. विशेष:हा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. या सर्व प्रकारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे आणि खासदार सुजय विखे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष 

‘सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

राजकारणाचा दर्जा खालावला

दरम्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली ते माहित नाही, मात्र राजकारणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे. सत्तेत बसलेले पक्ष आमच्यावर आरोप करत आहेत. या सर्व गोंधळामध्ये राज्याचा विकास मागे पडला असून, नको ते विषय समोर येत आहेत. विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा जर विकासावर भर दिला तर अधिक चांगले होईल.

जोड्याला शोभेल असे वागावे 

दरम्यान यावेळी त्यांनी स्वपक्षाला देखील टोला लगावला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी जे जोडे घातले आहेत, त्यांनी त्याच जोड्याला शोभेल असे वागावे. आम्ही विरोधी पक्षाच्या जोड्यामध्ये आहोत. तर आम्ही विरोधी पक्षासारख खंबीर वागले पाहिजे. त्याचबरोबर आमची सत्ता होती, तेव्हा आम्ही काय केले आणि काय केले नाही हे ठासून सांगितले पाहिजे. सरकार पडण्याची विरोधकांनी वाट पाहू नये, तर असे कार्य करावे की ज्या कार्याची दखल घेऊन जनता आपोआपच सत्ताधाऱ्यांकडे पाठ फिरवून तुम्हाला निवडून आणेल असा सल्लाही त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिला आहे.

संबंधित बातम्या 

VIDEO: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या शस्त्रक्रिया होणार

VIDEO: विरोधकांची एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी, संप चिघळवण्याचा डाव; वडेट्टीवार म्हणतात, मधला मार्ग काढू

भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, राष्ट्रवादी जाब विचारणार; ईडी कार्यालयावर धडकणार

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.