AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडे आजारी, विरोधी पक्षनेत्यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द!

फडणवीस यांनी काल आणि आज हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, फडणवीस आणि दरेकर यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द झाल्याची माहिती मिळतेय. भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पंकजा मुंडे आजारी, विरोधी पक्षनेत्यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द!
देवेंद्र फडणवीस मराठवाडा पाहणी दौरा
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 5:42 PM

बीड : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी ढगफुटीसदृश्य पावसामुळं पुरता उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी काल आणि आज हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, फडणवीस आणि दरेकर यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द झाल्याची माहिती मिळतेय. भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Opposition leader Devendra Fadnavis and Praveen Darekar’s Beed district inspection tour canceled)

भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी

पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी आगामी चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे. आगामी चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. 1 ऑक्टोबर रोजी ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली होती.

फडणवीस, दरेकर 4 ऑक्टोबरला उस्मानाबाद दौऱ्यावर

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर 4 ऑक्टोबर रोजी जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. त्यावेळी ते उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील करजखेडा, दाऊतपूर, तेर, आवाड शिरपुरा, वाकडी, सौंदना अंबा या गावातील नुकसानाची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नुकसानाची फडणवीस, दरेकरांकडून पाहणी

दरम्यान, फडणवीस आणि दरेकर यांनी आज नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्ह्यातील तमलुर, शेवाळा, शेळगाव, सगरोळी, कासराळी आदी गावांमध्ये शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी फडणवीसांसमोर टाहो फोटला. सरकार दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी फडणवीसांकडे केली.

दानवेंकडून उद्धव ठाकरेंना ‘त्या’ वक्तव्याची आठवण

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं आणि शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी रावसाहेब दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. त्यावेळी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादेत असताना पंचनामे कशाचे करता, मदत जाहीर करा, अशी मागणी केली होती. आता नशिबाने उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी पंचनामे न करताना थेट शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

इतर बातम्या :

अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका; आमदार नमिता मुंदडांचं धनंजय मुंडेवर टीकास्त्र

‘जनतेचा आवाज दाबता येत नसतो’, मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या राजकारणावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

Opposition leader Devendra Fadnavis and Praveen Darekar’s Beed district inspection tour canceled

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....