पंकजा जेव्हा मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून देतात!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांनाही हात घालायला सुरुवात केली आहे. (Pankaja Munde reminded bjp of OBC census)

पंकजा जेव्हा मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या 'कुछ वादेंची' आठवण करून देतात!
Pankaja Munde Corona Positive
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 1:07 PM

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांनाही हात घालायला सुरुवात केली आहे. पंकजा यांनी आता थेट ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी भाजपचे नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्विट करून मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून दिली आहे. (Pankaja Munde reminded bjp of OBC census)

पंकजा मुंडे यांनी आज एक ट्विट करून भाजपला जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत हे ट्विट केलं आहे. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना आपण काय लिहिलं हे समजण्यासाठीच त्यांनी हिंदीत हे ट्विट लिहिलं असावं, असं राजकीय जाणकार सांगतात.

पंकजा यांनी पोस्टसोबत एक व्हिडीओही अपलोड केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे लोकसभेतील गोपीनाथ मुंडे यांचं 18 मिनिटाचं भाषण आहे. त्यात त्यांनी लोकसभेतील उपनेते म्हणून ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर भाजपची सत्ता आली पण अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. आज खुद्द पंकजा मुंडेंनी हिंदीत ट्विट करत थेट दिल्लीला ओबीसींच्या जनगननेची आठवून करून दिलीय.

मुंडे काय म्हणाले होते?

या देशात 54 टक्के ओबीसी आहेत. याचा अर्थ 54 कोटी लोकांच्या जीवनाशी संबंधित विषयावर आपण चर्चा करत आहोत. पण सरकारने ओबीसींबाबत सरकारने कधीच निर्णय घेतला नाही. 1931मध्ये एकदाच फक्त ओबीसींची जनगणना झाली होती. त्यानंतर आज 80 वर्ष झाली, ओबीसींची लोकसंख्या किती आहे, याची जनगणना झाली नाही. आताही ओबीसींची जनगणना केली नाही तर ओबीसींना आपण पुढची दहा वर्ष सामाजिक न्याय मिळवून देवू शकणार नाही, असं गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेत ठणकावून सांगितलं होतं.

2007मध्ये आयआटीमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात आलं. त्यानंतर कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे कोर्टाने ओबीसींची लोकसंख्या किती आहे याची माहिती केंद्राला विचारली होती. त्यावेळी आमच्याकडे ओबीसींची आकडेवारीच नसल्याचं केंद्राने कोर्टाला सांगितलं होतं, त्यामुळे या जनगणनेची मागणी करण्यात येत आहे, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं. संविधानात दलित, ओबीसींसाठी आरक्षण नसतं तर दलित-ओबीसी खासदार खुल्या जागेतून निवडून आले असते का? देशात जातीपाती नाहीत का? काल परवाच हरयाणात दलितांची घरं जाळली. महाराष्ट्रात खैरलांजी येथे दलित कुटुंबाची नग्न धिंड काढून मारण्यात आलं, याकडेही मुंडे यांनी लोकसभेचं लक्ष वेधलं होतं. छत्रपती शाहू महाराज यांनी देशात दलित-ओबीसींना आरक्षण दिलं होतं. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारे ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठीच जनगणना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

मुंडेंचा पहिला प्रयत्न

केंद्रात 2014मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खातं गेलं होतं. देशात भाजपची सत्ता आल्यानंतर ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि ओबीसी जनगणनेचा प्रश्न पुन्हा अडगळीत पडला. आता पंकजा मुंडे यांनी पुन्हा हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे त्यांना भाजपमधून या मुद्द्यावर कितपत साथ मिळेल हे आताच सांगणं कठिण असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (Pankaja Munde reminded bjp of OBC census)

ओबीसी नेत्या होण्याचा प्रयत्न

पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी ओबीसींची जनगणाना करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय जाणकार या दोन घटनांचे अनेक अर्थ लावत आहेत. पंकजा यांचा विधानसभेत पराभव झाला आहे. भाजपकडून त्यांना विधानपरिषद किंवा राज्यसभा देण्यात आलेली नाही. अशा वेळी स्वत:चं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पंकजा यांनी आता राष्ट्रीय स्तरावर ओबीसी नेत्या म्हणून त्यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ओबीसी आहेत. पण त्यांनी त्यांची प्रतिमा सर्वसमावेशक राजकारणी अशी केली आहे. तर उमा भारती आणि इतर भाजपचे ओबीसी नेत्यांचा आता म्हणावा तसा करिश्मा राहिलेला नाही. त्यामुळे पंकजा यांनी स्वत:चाी राजकीय स्पेस शोधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (Pankaja Munde reminded bjp of OBC census)

संबंधित बातम्या:

आम्हीही याच देशाचे, आमचीही गणती करा, पंकजा मुंडेंची मागणी, गोपीनाथरावांचा व्हिडीओ ट्विट

काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

माजी मुख्यमंत्री, आजी मुख्यमंत्री, शॅडो मुख्यमंत्री आणि किंगमेकर; एक फोटो अनेक अर्थ!

(Pankaja Munde reminded bjp of OBC census)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.