एअरस्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायला हवं होतं : पंकजा
जालना : सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्ब बांधून पाठवायला हवं होतं, मग कळलं असतं, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी जालन्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथे सभा घेतली. पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? ” आमच्या […]
जालना : सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्ब बांधून पाठवायला हवं होतं, मग कळलं असतं, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी जालन्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथे सभा घेतली.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
” आमच्या सैन्यावर भ्याड हल्ला झाल्यावर सर्जिकल स्ट्राईक केला, हे इतिहासात पहिल्यांदा झालंय. सर्जिकल स्ट्राईक कुणी केलंय, त्याचे पुरावे काय? मी म्हणलं, एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधींना पाठवायचं होतं दुसऱ्या देशामध्ये. मग कळलं असतं.” असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. आयईडीने भरलेली गाडी सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले.
या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर 12 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायूदलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. सुमारे एक हजार किलोचा बॉम्ब भारतीय वायूदलाने जैशच्या दहशतवादी तळांवर टाकला.
भारतीय वायूदलाने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारेल गेले, यावरुन भारतात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. एअरस्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, हे सरकारने सांगावे, अशी मागणी विरोधी पक्षातील अनेकांनी केली होती. मात्र, “वायूदलाने स्पष्ट केले होते की, आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं, किती दहशतवादी ठार झाले, हे मोजण्याचे काम वायूदलाचे नाही.”