केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून चालणार नाही; पंकजा मुंडेंनी सुनावलं

| Updated on: Apr 28, 2021 | 8:01 PM

लसीकरणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. (pankaja munde slams maha vikas aghadi over vaccination)

केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून चालणार नाही; पंकजा मुंडेंनी सुनावलं
pankaja munde
Follow us on

मुंबई: लसीकरणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी ठाकरे सरकारला रामबाण उपाय सांगितला आहे. जास्तीत जास्त लसीकरण केंद्र आणि कमीत कमी अवधी या सूत्रानेच लसीकरण मोहीम यशस्वी होईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच 18 वर्षांवरील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी सरकारला सुनावलं आहे. (pankaja munde slams maha vikas aghadi over vaccination)

पंकजा मुंडे यांनी ट्विट करून हे सूत्रं मांडलं आहे. जास्तीत जास्त लसीकरण केंद्र कमीत कमी अवधी हे सूत्र करावे लागेल. लसींचं उत्पादन करणे, साठा बनवणे, तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल, असं पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी #VaccineForAll हा हॅशटॅगही वापरला आहे.

केंद्रावर जबाबदारी टाकून जमणार नाही

1 मे रोजी सेकंड डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे. तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे व्हॅक्सीन, रेमडेसिवीरचे ऑडिट आणि दैनंदिन वार्तापत्रं झाले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. जेष्ठ नागरिक आणि लसीचा दुसरा डोस घेणार्‍या लोकांचे वेगळे नियोजन आणि 18 ते 44 वयोगटांतील लोकांचे वेगवान नियोजन करावे लागेल. लसीकरण होताना विलंब दिरंगाई होता कामा नये.. रेमडेसिवीर सारखे वाटप अन्यायकारक होऊ नये हे अत्यंत महत्वाचे आहे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

घोषणा महत्त्वाकांक्षी तरीही स्वागतार्ह

18 ते 44 वयाच्या नागरिकांना मोफत लस ही घोषणा महत्त्वाकांक्षी तरीही स्वागतार्ह आहे. लस मिळवण्यासाठी आणि सुरळीत लसीकरण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन हे मोठे आव्हान आहे, असं सांगतानाच जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या आव्हानांना पेलण्यासाठी यंत्रणांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

टोपे काय म्हणाले?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं टोपे यांनी सांगितलं होतं. (pankaja munde slams maha vikas aghadi over vaccination)

 

संबंधित बातम्या:

Covishield vaccine price : राज्यांसाठी कोविशिल्ड लसीच्या दरात कपात, पुनावालांची घोषणा, नवा दर किती?

राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान

Maharashtra Coronavirus LIVE Update : नागपुरात आज पुन्हा 102 रुग्णांचा मृत्यू, 7503 नव्या रुग्णांची नोंद

(pankaja munde slams maha vikas aghadi over vaccination)