बिनडोक आहात का रे? घोषणा काय देताय येड्यांनो? : पंकजा मुंडे

बीड : भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये थेट कार्यकर्त्यांनाच झापलं. पंकजा मुंडे यांचं भाषण सुरु असताना, आमदार लक्ष्मण पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यावेळी या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला एवढे वेडे लोक जगात कुठेच सापडले नाहीत. तुम्ही तुमच्या नेत्याचं वाटोळं करु नका. तुम्ही काय […]

बिनडोक आहात का रे? घोषणा काय देताय येड्यांनो? : पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

बीड : भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये थेट कार्यकर्त्यांनाच झापलं. पंकजा मुंडे यांचं भाषण सुरु असताना, आमदार लक्ष्मण पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यावेळी या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला एवढे वेडे लोक जगात कुठेच सापडले नाहीत. तुम्ही तुमच्या नेत्याचं वाटोळं करु नका. तुम्ही काय बिनडोक आहात का रे? तुम्ही काय घोषणा देताय येड्यांनो.”

आमदार लक्ष्मण पवार यांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करायला लागल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, “ऐकू तर द्या. काय जाहीर करायचंय येड्यांनो? एकानं बोला, एकानं बोला. ऐकू येत नाही. काय जाहीर करायचंय? काय? अरे पागल आहात का तुम्ही लोक? मला एवढे वेडे लोक जगात कुठेच सापडले नाहीत. स्वत:च्या नेत्याचं वाटोळं करु नका.”

“आम्ही बीड जिल्ह्याचा पाया मजबूत केला आहे. मागच्या सरकारच्या काळात मी प्रचार केला, तर माझे मणके ढिले झाले, मला मणक्यांचा आजार झाला. पूर्वी देशात रस्त्याच्या बाजूला रांगा लावून लोक बसलेले असायचे. पण आता स्वच्छता अभियानामुळे हे चित्र दिसत नाही. सर्वाधिक पीक विमा बीड जिल्ह्याला मिळाला.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“पूर्वी सगळे नेते पश्चिम महाराष्ट्रातले होते, पण आज ही परिस्थिती नाही, विदर्भ आणि मराठवाड्याला नेतृत्व मिळालं आहे.” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

जयदत्त क्षीरसागर यांचं आणि माझं चांगलं जमतं, यामुळे काही जणांच्या पोटात दुखतं, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.