Video: फडणवीसांच्या नेतृत्वात शाहांना शिष्टमंडळ भेटतंय, साखर कारखान्याचे प्रश्न सुटतील? पंकजा मुंडे म्हणाल्या शुभेच्छा !

साखर कारखान्यांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमधील प्रचारातील सहभाग या मुद्यांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ साखर कारखान्यांच्या प्रश्नावर सहकार मंत्री अमित शाह यांना भेटणार आहे, त्यासंदर्भात विचारलं असता पंकजा मुंडे यांनी प्रश्न सुटणार असल्यास शुभेच्छा असल्याचं म्हटलं.

Video:  फडणवीसांच्या नेतृत्वात शाहांना शिष्टमंडळ भेटतंय, साखर कारखान्याचे प्रश्न सुटतील? पंकजा मुंडे म्हणाल्या शुभेच्छा !
देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 3:13 PM

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात होत असल्यांच्या आरोपांकडे आरोपांसारखं बघते, असं म्हटलंय. तरुणांपर्यंत अमंली पदार्थ कसे पोहोचतात, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील निवडणुकीचा प्रचार, साखर कारखान्यांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमधील प्रचारातील सहभाग या मुद्यांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ साखर कारखान्यांच्या प्रश्नावर सहकार मंत्री अमित शाह यांना भेटणार आहे, त्यासंदर्भात विचारलं असता पंकजा मुंडे यांनी प्रश्न सुटणार असल्यास शुभेच्छा असल्याचं म्हटलं.

महाराष्ट्राइतकं प्रेम मध्यप्रदेशमध्ये मिळालं

गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून महाराष्ट्रात जे प्रेम मिळतं ते मध्यप्रदेशमध्येही मिळाली. मुंडे साहेबांनी मध्य प्रदेशात केलेलं काम पाहण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेशात खूप छान प्रतिसाद मिळालं. मध्य प्रदेश भाजप संघटनेकडून शिकायला मिळालं. तिथलं काम, तिथली संघटना कशी असू शकते हे पाहायला शिकायला मिळालं. तिथं आमच्या जागा निवडून येतील, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तिथल्या निवडणुकीच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळाला, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

फडणवीसांना शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना आम्ही साखर कारखान्यांचे प्रश्न सांगत होतो. ते अमित शाह यांच्याकडे साखर कारखान्यांच्या प्रश्नांसाठी गेले असतील तर प्रश्न सोडवतील. साखर कारखाने आणि आजारी साखर कारखाने अशी वर्गवारी करणं आवश्यक आहे. जे कारखाने आर्थिकदृष्ट्या असक्षम आहेत त्यांना उभं करणं गरजेचं आहे. कारखानदार म्हणण्याऐवजी शेतकऱ्यांचा कारखाना यादृष्टीनं पाहिल्यास प्रश्न सुटतील. देवेंद्र फडणवीस साखर कारखान्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीत गेले असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

मध्य प्रदेशचा झंझावात महाराष्ट्रात दिसणार का?

महाराष्ट्रात आगामी काळात महानगरपालिका, स्थानिक स्वराज संस्थांच्या, मिनी विधानसभेच्या आखाड्यात मध्य प्रदेश प्रमाणं झंझावात पाहायला मिळणार का? असा प्रश्न विचारलं असता पंकजा मुंडे यांनी का पाहायला मिळणार नाही,असं म्हटलं. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या संदर्भात राज्याची टीम, कोअर कमिटी ठरवेल आणि तसं काम करु,असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

इतर बातम्या:

Pankaja Munde | मराठवाड्यातील लोकांसाठी मी आहे हे विसरु नका – पंकजा मुंडे

Special Report | पंकजा मुंडे यांची गडकरींशी भेट, नाराजीवरून चर्चा थेट?

Pankaja Munde wish Devendra Fadnavis over meeting with Amit Shah for sugar mill issue

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.