Parambir Singh Letter : अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, मुख्यमंत्री काय कारवाई करणार?
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतचा चेंडू शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टोलावला आहे. शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहे.
नवी दिल्ली : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी भाजपकडून होत आहे. मात्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतचा चेंडू शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टोलावला आहे. शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहे.(Anil Deshmukh’s resignation will be decided by CM Uddhav Thackeray, clear from Sharad Pawar)
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. पण त्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्रीच याबाबतचा निर्णय घेतील असं शरद पवार यांनी आज जाहीर केलं. गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. परमबीर सिंग यांनी 100 कोटीच्या वसुलीचा आरोप केलाय. पण त्याबाबत पैसा कसा गोळा केला जातो याची माहिती त्यांनी दिलेली नाही. दरम्यान, देशमुखांची बाजूही आम्ही जाणून घेऊ. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पवार यांनी दिलीय.
The allegations against the Maharashtra Home Minister are serious: NCP Chief Sharad Pawar on former Mumbai Police Commissioner Param Bir Singh’s letter to CM pic.twitter.com/3ofawNmDer
— ANI (@ANI) March 21, 2021
सरकारवर कुठलाही परिणाम नाही
थेट गृहमंत्र्यांवर आरोप होत असल्यामुळे सरकारवर त्याचा काही परिणाम होईल का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावेळी महाराष्ट्र सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेवरही त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना आरोप का केला नाही? असा प्रश्नही पवारांनी विचारला आहे. विरोधकांकडून सरकार अस्थित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असंही पवार यांनी म्हटलंय.
देशमुखांबाबत निर्णय दोन दिवसांत
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल. देशमुख उद्या मुंबईत येतील. त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. तसंच अन्य नेत्यांशी बोलून देशमुखांबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता देशमुख गृहमंत्रीपदावर कायम राहणार की त्यांची उचलबांगडी केली जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवारhttps://t.co/kRWjC9TWB4#sharadpawar | #ncp | #SachinVaze | #MansukhHiren | #AntiliaCase | #NIA | #maharashtra | #mahavikasaghadi | #AnilDeshmukh
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2021
संबंधित बातम्या :
सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच : शरद पवार
‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार
Anil Deshmukh’s resignation will be decided by CM Uddhav Thackeray, clear from Sharad Pawar