पार्थ पवार यांचा तब्बल 215913 मतांनी पराभव, कुठे किती लीड?
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का एक टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक होती. या मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे […]
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का एक टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक होती. या मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार तर वंचित बहुजन आघाडीकडून राजाराम पाटील यांच्यात तिहेरी लढत होती.
शिवसेना – श्रीरंग बारणे
पनवेल – 160355
कर्जत – 83996
उरण – 89587
मावळ – 105272
चिंचवड – 176475
पिंपरी – 103235
पोस्टल – 1713
एकूण – 720663
राष्ट्रवादी – पार्थ पवार
पनवेल – 105727
कर्जत – 85846
उरण – 86699
मावळ – 83445
चिंचवड – 79717
पिंपरी – 61941
पोस्टल – १३७५
एकूण – 504750
पार्थ पवार यांचा 2 लाख 15 हजार 913 मतांनी पराभव
2019 मावळ लोकसभा मतदारसंघा मधील मतदान %
पनवेल – 55.33%
कर्जत – 67.76%
उरण -67.21%
मावळ – 62.60%
चिंचवड – 56.19%
पिंपरी -54.46%