VIDEO : आजोबांना पंतप्रधान करायचंय : पार्थ पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त करुन दाखवली. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना पार्थ पवार म्हणाले, “आपल्याला आजोबांना (शरद पवार) पंतप्रधान करायचंय, तेच ध्येय आपल्याला ठेवायचंय.” पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर […]

VIDEO : आजोबांना पंतप्रधान करायचंय : पार्थ पवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त करुन दाखवली. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना पार्थ पवार म्हणाले, “आपल्याला आजोबांना (शरद पवार) पंतप्रधान करायचंय, तेच ध्येय आपल्याला ठेवायचंय.”

पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. ठिकठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेचे मेळावे, सभा घेऊन पार्थ पवार यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यावेळी पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथील सभेत बोलताना पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान बनवण्याची इच्छाही व्यक्त केली.

पार्थ पवार नेमके काय म्हणाले?

“सगळे एकत्र मिळून निवडणुकीत काम करु. मतभेद असतील, ते विसरुन जाऊया. आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचंय. तेच आपल्याला ध्येय ठेवायचंय. माझी प्रगती, हीच आपली प्रगती असे समजून आपण काम करुया.” असे पार्थ पवार आकुर्डीतील सभेत म्हणाले.

दरम्यान, मोदी जर गुजरातमधील कामं देशभर पोहोचवत असतील, तर आपण पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने केलेली कामं महाराष्ट्रभर का पोहोचवू शकत नाही, असा सवाल कर पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत कामं पोहोचवण्याचं आवाहन केलं.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.