आदित्यसाहेबांनी काय कमी केलं? त्यांच्या मैत्रिची अशी परतफेड झाली; प्रभादेवी राड्यानंतर युवासेनेच्या नेत्याचे भावनिक ट्विट
प्रभादेवीमध्ये दोन दिवसांपूर्वी शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या (Shiv sena) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. या राड्यानंतर आता युवासेनेच्या नेत्याकडून भावनिक आवाहन करणारे ट्विट पोस्ट करण्यात आले आहे.

मुंबई : प्रभादेवीमध्ये दोन दिवसांपूर्वी शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या (Shiv sena) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. या राड्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींना अटक देखील झाली. मात्र त्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेकडून पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन देखील करण्यात आले. त्यानंतर आता युवासेना कोअर कमिटीचे सदस्य आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे चिरंजीव पवन जाधव यांनी माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना उद्देशून ट्विटरवर एक भावनिक पोस्ट लिहीली आहे.
ट्विटमध्ये काय म्हटलं?
शिंदे गटात सहभागी झालेल्या समाधान सरवणकर यांना उद्धेशून या पोस्टमध्ये भावनिक आव्हान करण्यात आले आहे. ‘समा स्वतःच्या मनावर हात ठेवून आणि तुझ्या आईला स्मरुन सांग आदरणीय आदित्यसाहेबांनी तुझ्यासाठी काय कमी केलं की तु त्यांच्या मैत्रीची परतफेड अशी करु शकतोस. तुझी राजकारणातली वाट जरी भरकटली असेल तरी तू एक चांगला मित्र गमावलास हे सत्य लपू शकत नाही..!’ असं ट्विट पवन जाधव यांनी केलं आहे.
राणेंनी घेतली सदा सरवणकरांची भेट
दरम्यान दुसरीकडे आज नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. हल्ले करू नका नाहीतर मुंबईत चालणं, बोलणं आणि फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असं राणे यांनी म्हटलं आहे. तसेच गोळीबार झाला असता तर आवाज तरी आला असता असं म्हणत त्यांनी गोळीबाराचा आरोप फेटाळून लावला आहे.
समा स्वतःच्या मनावर हात ठेवून आणि तुझ्या आईला स्मरुन सांग आदरणीय आदित्यसाहेबांनी तुझ्यासाठी काय कमी केलं की तु त्यांच्या मैत्रीची परतफेड अशी करु शकतोस. तुझी राजकारणातली वाट जरी भरकटली असेल तरी तू एक चांगला मित्र गमावलास हे सत्य लपू शकत नाही..!#GetWellSoonSama@samadhan234 pic.twitter.com/B0pnVrUe4j
— Pawan Jadhav (@PawanJadhav05) September 12, 2022