Rajya Sabha Election : आघाडीचा जीव भांड्यात ! भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले, आव्हाड, ठाकूरांची मतं वैध

भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले.

Rajya Sabha Election : आघाडीचा जीव भांड्यात ! भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले, आव्हाड, ठाकूरांची मतं वैध
जितेंद्र आव्हाड, मंत्रीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:59 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांच्या मतदानावर भाजपनं (BJP) आक्षेप घेतला होता. आव्हाडांनी मतपत्रिका जयंत पाटलांच्या हातात दिली. तर ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करण्याची मागणी भाजपनं केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने ही मागणी फेटाळली असून महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडलाय. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजार होत असल्याच्या चर्चा होत्या. यातच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. कोणताही आमदार फुटू नये, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून खबरदारी घेतली जात होती. आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. यावेळी अगदी एक-एक मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रयत्न होत असल्याचंही दिसून आलं. त्यातच आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मते अवैध ठरवण्याची मागणी भाजपनं केली होती. यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणखी चिंतेत आले होते.

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असताना यात दोन पोलिंग एजंटनें तीन मतांवर आक्षेप घेतला. भाजप आमदार पराग आळवणी आणि अतुल सावे यांच्या पोलिंग एजंटने आक्षेप घेतला. यानंतर व्हिडीओ शूटिंग बघितलं जावं, अशी मागणी करण्यात आली. यशोमती ठाकूर, सुहास कांदे, आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपनं यावेळी आक्षेप घेतला. ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. हातात द्यायची नसते तर दुरून दाखवायची असते, असं त्यावेळी म्हटलं गेलं. दरम्यान, भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले आणि महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला.

आव्हाडांची जोरदार टीका

दरम्यान, भाजप नेते बावचाळले, अशी जोरदार टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. जितेंद्र आव्हाड काय म्हणाल पाहा…

हे सुद्धा वाचा

यशोमती ठाकूर यांची टीका

भाजपनं केलेल्या मागणीवर काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की,  महाविकास आघाडीचे उमेदवार येत आहेत. दुसरीकडे मात्र भाजपचे पडत आहेत. जसं महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपने केला तसाच प्रयत्न पोलिंग बूथ ठिकाणी करण्यात आला. त्यांचा उमेदवार पडणार लक्षात आल्यानंतर त्यांनी असा प्रयत्न केला, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली आहे. तर महाविकास आघाडीच्या इतरही नेत्यांनी यावेळी टीका केलीय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.