Chitra Wagh : बदलापूरला आंदोलन करण्यासाठी लोक मुंबईहून आले, चित्रा वाघ यांचा दावा
Chitra Wagh : "पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे मेडीकल. त्यामुळे मेडीकलला तीन चार तास गेले. ही पॉक्सोची केस आहे. चार-साडेचार वर्षाच्या मुलीला ज्यांना आपल्या शरीराची ओळख नाही. त्यांना बोलत करणं हे पोलिसांच स्कील असतं" असं चित्रा वाघ म्हणाल्या.
बदलापूरच्या नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलय. सर्वसामान्यांच्या मनात संतापाची भावना आहे. विविध राजकीय नेते आज बदलापूर शहराला भेट देत आहेत. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आज बदलापूरला आल्या होत्या. त्यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्याचवेळी सरकारने जी पावलं उचलली, त्याचं समर्थन सुद्धा केलं. “झालेली गोष्ट अतिशय वाईट, मनाला वेदना देणारी आहे. ज्या वेळी मुलीच्या आईला ही घटना समजली, ती पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये आली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे मेडीकल. त्यामुळे मेडीकलला तीन चार तास गेले. ही पॉक्सोची केस आहे. चार-साडेचार वर्षाच्या मुलीला ज्यांना आपल्या शरीराची ओळख नाही. त्यांना बोलत करणं हे पोलिसांच स्कील असतं” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“मुलींच वय लक्षात घेता, पोलिसांना त्यांना बोलत करण्यासाठी वेळ लागला. एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या” असं चित्रा वाघ म्हणाल्या. “सरकार म्हणून एसआयटीची स्थापना केली गेली. उज्वल निकम यांच्यासारखे वकील या केसला देण्यात आले. सरकार म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी जी जी पावलं उचलण आवश्यक आहे, ते ते सर्व सरकारने केलं” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
’10 नंतर कोण लोक आले? कुठून आले?’
“बदलापूरमध्ये काल जनतेचा उद्रेक बघितला. स्थानिक आमदार किसन कथोरे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या प्रक्रियेत होते. गिरीश महाजन तिथे आलेले. केसरकर आले. बरेच लोक मुंबईहून आंदोलन करण्यासाठी आले. ज्या पद्धतीने याला वेगळं स्वरुप दिलं गेलं त्याच दु:ख आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या. “आंदोलनकर्त्यांच्या हातात लाडकी बहिण योजना रद्द करा, असे बॅनर होते. सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या सर्व केल्या. मग लाडकी बहिण योजना नको हे बॅनर का लागले. सकाळी 10 वाजेपर्यंत आंदोलन झाले, त्यामध्ये सगळे बदलापूरकर होते. पण 10 नंतर कोण लोक आले? कुठून आले? बदलापूरला इतकी वर्ष पाहतोय, झालेल्या गोष्टीच समर्थन नाही, ती अमानवीय, विकृत कृती आहे. पण ज्या पद्धतीने याला वेगळ स्वरुप देण्यात आलं, त्याचं दु:ख आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या.