अजित पवारांच्या सभेत बॅनरवर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असलेल्या मंचावरील बॅनरवर एका मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट-बकाल येथे राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रे अंतर्गत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. मंचावर […]

अजित पवारांच्या सभेत बॅनरवर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असलेल्या मंचावरील बॅनरवर एका मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट-बकाल येथे राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रे अंतर्गत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. मंचावर लावण्यात आलेल्या फोटोमुळे या सभेला आलेल्या नागरिकांमध्ये कुजबूज सुरू होती.

बॅनरवर असलेल्या आरोपीचे नाव दीपक मानकर आहे. तो राष्ट्रवादी पक्षाचा विद्यमान नगरसेवक आहे. पुणे येथील शहर पोलीस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी 2 जून 2018 रोजी हडपसरजवळ रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहिलेल्या आत्महत्या पत्रात दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लिहले होते. रस्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला होता. यामुळे पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक दीपक मानकर विरोधात मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या घटनेनंतर दीपक मानकर याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मानकरने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळाला होता. त्यामुळे सध्या मानकर हा तुरुंगात आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्या व्यक्तरिक्त मानकरवर इतरही बरेच गुन्हे दाखल आहेत.

अनेक गुन्ह्यांचा आरोपी असलेल्या दीपक मानकरचा फोटो आपल्या सभेवेळी लावून राष्ट्रवादी त्याला समर्थन तर करत नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.