स्वत: जमिनीवर बसून महिलेला खुर्ची दिली, महाराष्ट्रातील महिला आमदाराच्या साधेपणावर कौतुकाचा वर्षाव
चंद्रपूरमधील वरोऱ्याच्या (Warora Assembly) काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या साधेपणाची वाहवा सर्वत्र होत आहे. आमदार प्रतिभा धानोरकर या स्वत: जमिनीवर बसून दुसऱ्या वयस्कर महिलेला खुर्चीवर बसवलं.
चंद्रपूर : गावपुढाऱ्यांचा लवाजमा आणि तामझाम हा आमदार-खासदारांपेक्षा कमी नसतो. सरपंच, नगरसेवकांपासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत पुढाऱ्यांचा बडदास्त सर्वांनी पाहिली आहे. मात्र काही पुढारी असतात ज्यांचा साधेपणा हीच श्रीमंती असते. अशीच काहीशी श्रीमंती सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाली आहे. चंद्रपूरमधील वरोऱ्याच्या (Warora Assembly) काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या साधेपणाची वाहवा सर्वत्र होत आहे. आमदार प्रतिभा धानोरकर या स्वत: जमिनीवर बसून दुसऱ्या वयस्कर महिलेला खुर्चीवर बसवलं.
सोशल मीडियावर फोटोचं कौतुक
काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या साधेपणाचं मोठं कौतुक होत आहे. प्रतिभा धानोरकर या दगडावर बसल्या आहेत. त्या स्वत: दगडावर बसून चहा पित आहेत. बाजूला एक खुर्ची आहे. त्या खुर्चीवर एक महिला बसली आहे. आमदार असलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी स्वत: खुर्चीवर न बसता दुसऱ्या महिलेला खुर्चीवर बसायला लावून, स्वत: खाली बसल्या.
नेमका काय घडलं?
भद्रावतीच्या शास्त्री नगरात एका विकासकामाचं भूमीपूजन होतं. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर चहा-पाणी सुरु होतं. चहा घेतेवेळी आमदार धानोरकर यांना वयस्कर महिला पदाधिकारी उभ्या असल्याचं दिसल्या. त्यांनी आपली खुर्ची त्या महिला पदाधिकारीला दिली. त्या स्वत: खुर्चीवरुन उठल्या आणि महिलेला खुर्चीवर बसवलं. मग आमदार धानोरकर स्वतः खाली दगडावर बसल्या. आमदार धानोरकर यांचा हा साधेपणा अनेकांना भावला. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
कोण आहेत आमदार प्रतिभा धानोरकर ?
- प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत
- त्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात
- राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर हे त्यांचे पती आहेत.
- महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती कायदा आणा ही सर्व प्रथम मागणी प्रतिभा धानोररकर यांनीच केली होती.
- शिवाय तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याची मागणी सुद्धा धानोरकर यांनीच केली आहे
कोण आहेत बाळू धानोरकर?
सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही, असे वाटत असतानाच बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी अनपेक्षित विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. चंद्रपूरच्या मतदारसंघात त्यांनी चक्क केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली होती. या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता. त्यामुळे अनेकदा बाळू धानोरकर हे नाव चर्चेत असते.
बाळू धानोरकर आधी चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून लोकसभेसाठीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदार पदाचाही राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत ते चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजयी झाले होते.
संबंधित बातम्या
महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकांडा शिलेदार; कोण आहेत खासदार बाळू धानोरकर?