PCMC Election 2022 : अरे निवडून निवडून येणार कोण?; प्रभाग क्रमांक 16चं गणित समजून घ्या!
PCMC Election 2022 : या प्रभागातून कोणत्या तीन नगरसेवकांना निवडून द्यायचं हे येथील 35 हजार 424 मतदार ठरवणार आहेत. या मतदारसंघात एकूण 6 हजार 950 अनुसूचित जातीचे मतदार आहेत. तर 370 अनुसूचित जमातीचे मतदार आहेत.
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेची (PCMC Election 2022) आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्याआधी पिंपरी-चिंचवडच्या पालिका प्रभागांची फेररचनाही करण्यात आली आहे. या फेररचनेत काही प्रभाग वाढले आहेत. पूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये 32 प्रभाग होते. आता ही संख्या 46वर गेली आहे. म्हणजे फेररचनेत 14 नव्या प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील मतदारांना यंदा 139 उमेदवार (candidate) निवडून द्यायचे आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे नव्या फेररचनेमुळे सत्ता राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर (bjp) उभं ठाकलं आहे. कारण नव्या फेररचनेत 14 प्रभागांची भर पडली आहे. म्हणजे जवळपास 11 नगरसेवकांची भर नव्या पालिकेत पडणार आहे. आणि हे नगरसेवक शहराचा नवा महापौर ठरवणार आहे. त्यामुळे नव्या प्रभागांवर सर्वच राजकीय पक्षांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. नाही तर महापालिका हातातून निसटल्याशिवाय राहणार नाही असं तरी सध्या चित्रं आहे.
भाजप-राष्ट्रवादी समसमान
मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16मधून भाजप आणि राष्ट्रवादीने समसमान म्हणजे प्रत्येकी दोन दोन जागा जिंकल्या होत्या. मागच्या निवडणुकीत म्हणजे 2017मध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये चार वॉर्डांपैकी दोन वॉर्डात भाजप आणि इतर दोन वॉर्डात राष्ट्रवादीने विजय मिळवला होता.
प्रभाग क्रमांक 16 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
चार पैकी दोन मतदारसंघात महिला विजयी
गेल्यावेळी प्रभाग क्रमांकमधील चार पैकी दोन मतदारसंघातून महिला उमेदवार विजयी झाली होती. मागच्यावेळी प्रभाग क्रमांक 16 क्रमांक अ मधून भाजपचे बाळासाहेब ओव्हाळ विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 16 ब मधून राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खानोलकर विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 16 क्रमांक क मधून भाजपच्या संगीता भोडवे तर प्रभाग क्रमांक 16 ड मधून राष्ट्रादीचे मोरेश्वर भोंडवे विजयी झाले होते.
प्रभाग क्रमांक 16 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
कुठून कुठपर्यंत
नव्या परिसीमनामध्ये प्रभाग क्रमांक 16ची व्याप्ती वाढली आहे. नेहरूनगर, अंतरीक्ष सोसायटी, विठ्ठलनगर, मगर स्टेडियम, टाटा मोटर्स, अमृतेश्वर कॉलनी आणि यशवंत नगरचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 16 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
35 हजार मतदार ठरवणार
या प्रभागातून कोणत्या तीन नगरसेवकांना निवडून द्यायचं हे येथील 35 हजार 424 मतदार ठरवणार आहेत. या मतदारसंघात एकूण 6 हजार 950 अनुसूचित जातीचे मतदार आहेत. तर 370 अनुसूचित जमातीचे मतदार आहेत. हे मतदार आता आपल्या प्रभागातील नगरसेवक ठरवणार आहेत.
यंदा वॉर्ड घटले
मागच्यावेळी प्रभाग क्रमांक 16 मध्ये चार वॉर्ड होते. यंदा तीनच वॉर्ड ठेवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 16 अ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 16 ब हा सर्वसाधरण महिलांसाठी राखीव असून प्रभाग क्रमांक 16 क खुला आहे. त्यामुळे या प्रभागातील मतदारांना यंदा फक्त तीनच उमेदवार निवडून द्यायचे आहेत.