PM Modi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत, पत्रिकेवर नाव नसल्याने नवा वाद
पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, कारण निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावरून आता जोरदार राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) उपस्थित राहणार नाहीत, कारण निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावरून आता जोरदार राजकारण पेटण्याची शक्यता आहे. तर आदित्य ठाकरेही पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, अशीही माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याऐवजी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री सुभाष देसाई विमानतळावर पंतप्रधान मोदीचं स्वागत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आज सायंकाळी 5 वाजता हा सोहळा पार पडणार आहे.
नवा वाद पेटणार?
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख उपस्थिती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेष अतिथी म्हणून उषा मंगेशकर यांचे नाव आहे. तर निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नाही. आज संध्याकाळी मोदी आणि ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर एकाच मंचावर येत असल्याची माहिती सुरूवातील समोर आली होती. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा आणि यात देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री एका वेगळ्या मंचावर एकत्र दिसणार त्यावेळी काय होणार? दोघांमध्ये अशा वेळी नेमकी काय चर्चा होणार, असे अनेक सवाल उपस्थित झाले होते, मात्र आता आलेल्या अपडेट माहिती नुसार हीही शक्यता आता मावळली आहे. आता याच पत्रिकवर नाव नसल्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. काही जणांनी हे जाणूनबुजून हे केल्याचा आरोपही आता होऊ शकतो. यावरून महाविकास आघाडीतील नेतेही आता जोरदार आक्रमक होण्याची शक्यात आहे.
कार्यक्रमाची पत्रिका
राज्यातला वाद आणखी वाढणार?
या कार्यक्रमातील पत्रिकेत मुख्यमंत्र्यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली असली तरी मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्या निमंत्रणाचा विचार करून कार्यक्रमाला जाणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यात सध्या विविध मुद्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी आक्रमक झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला, महाविकास आघाडी विरुद्ध राणा दाम्पत्य अशा विविध मुद्द्यांवरून राज्याच्या राजकारणात सध्या बराच गदारोळ सुरू आहे. त्यामुळे त्यानंतर आता हा कार्यक्रम पत्रिकेचाही वाद वाढण्याची शक्यता आहे.
Anil Bonde | राज्यात आणीबाणीची परिस्थिती; अनिल बोंडे म्हणतात, शिवसेनेची ही शेवटची फडफड, कारण काय?