AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi in Pune : ‘आज पुण्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली’, देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. आज पुण्याची आपली स्वत:ची मेट्रो धावली. या मेट्रोचं तिकीट पंतप्रधान मोदींनी मोबाईलवर काढली. तर आम्ही विनातिकीट प्रवास केला. त्यामुळे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आमचंही तिकीट नंतर घ्या, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी फडणवीसांनी केली.

Modi in Pune : 'आज पुण्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली', देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 12:52 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन पार पडलं. इतकंच नाही पंतप्रधान मोदींनी तिकीट काढत गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशनपर्यंतचा प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात झालेल्या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ‘पुण्यासाठी आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. पुण्याती आपली स्वत:ची मेट्रो धावली’, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. आज पुण्याची आपली स्वत:ची मेट्रो धावली. या मेट्रोचं तिकीट पंतप्रधान मोदींनी मोबाईलवर काढली. तर आम्ही विनातिकीट प्रवास केला. त्यामुळे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आमचंही तिकीट नंतर घ्या, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी फडणवीसांनी केली.

नदी शुद्धीकरण प्रकल्पाबाबतही मोदींचे आभार

फडणवीस यांनी यावेळी महामेट्रोचं कौतुक केलंय. महामेट्रोनं विक्रमी वेळेत पुणे मेट्रोचं काम पूर्ण केलं. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. तसंच आमच्या पुण्याच्या गंगेला पवित्र करण्यासाठी तुम्ही जायकाचा जो प्रकल्प मंजूर करुन दिला, त्याचं उद्घाटनही आज होणार आहे. त्यामुळे आमच्या पुण्याची पवित्र आणि स्वच्छ अशी आपली नदी आपल्याला पाहायला मिळणार आहे, असं सांगत फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे पुन्हा एकदा आभार मानले.

त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचेही फडणवीसांनी आभार व्यक्त केले. आज मोदींच्या हस्ते इलेक्ट्रिक बसेसंचही लोकार्पण करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर पुढे चालून एक पैशाचंही प्रदुषण महापालिकेच्या परिवहन विभागाकडून होणार नाही, याचा मला विश्वास आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींचा पुणे मेट्रो प्रवास

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन पार पडलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले प्रवासी ठरले. गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला. तत्पूर्वी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.

इतर बातम्या :

Narendra Modi | पंतधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण

Modi In Pune: पहले आप… पहले आप… फडणवीस आणि अजित पवारांचा एकमेकांना आग्रह; सर्वाधिक चर्चेतील फोटो काय सांगतो?

राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.