‘मोदी-शाहांची उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी तयारी, अशाने गंगा नदी हिंदू शववाहिनी होईल’

हे मृतदेहच भाजपला व त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांना पराभवाच्या लाटेकडे ढकलत आहेत. | PM Modi UP Election

'मोदी-शाहांची उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी तयारी, अशाने गंगा नदी हिंदू शववाहिनी होईल'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 8:54 AM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. ही निवडणूक कशी जिंकायची, यासाठी दोघेही कामाला लागले आहे. मोदी-शाहांच्या (PM Narendra Modi) या निवडणूक जिंकण्याच्या हव्यासापोटी गंगा नदी हिंदू शववाहिनी होईल, अशी जळजळीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. (PM Narendra Modi and Amit Shah starts preparation for UP assembly Elections 2022)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात कोरोनासंदर्भातील व्यवस्थापन कोसळले. त्यात पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन भाजपसाठी अडचणीचे ठरताना दिसत आहे. अशा वातावरणात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. गंगेत मृतदेह वाहत येत आहेत. कानपूरपासून पाटण्यापर्यंत गंगाकिनारी प्रेतांचे ढीग लागत आहेत. तेथेच त्यांचे दफन व दहन करावे लागत आहे. जगभरातील मीडियाने ही छायाचित्र छापल्याने भाजपच्या प्रतिमेस तडे गेले आहेत. ही बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी व उत्तर प्रदेशात निवडणुका जिंकण्यासाठी काय करायचे यासाठी मोदी-शाह कामाला लागले आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत गर्दी जमवून जी चूक केली तीच पुन्हा केंद्र सरकार करत आहे, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

भाजपचे हिंदुत्वाचे टुलकिट अपयशी

हिंदुत्ववाद्यांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयूचा प्रवाह पाहून हिंदू समाजाचे रक्त तेव्हा उसळले होते. त्यातून केंद्रात भाजपची सत्ता आली. पण त्याच गंगेत आज हिंदूंचे बेवारस मृतदेह तरंगत आहेत. हे मृतदेहच भाजपला व त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांना पराभवाच्या लाटेकडे ढकलत आहेत. मोठा गाजावाजा करूनही पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजय मिळवता आला नाही. स्वत: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक होते. हिंदुत्वाच्या नावावर धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे टुलकिट अपयशी ठरले, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

‘कोरोनामुळे मोदी आणि योगींची प्रतिमा डागाळली’

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला (Modi govt) अपयश आल्याच्या टीकेची गंभीर दखल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) घेतल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांनी विचारमंथन सुरु केल्याचे सांगितले जाते. यासाठी नुकतीच दिल्लीत संघ आणि भाजपच्या नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीला संघाचे नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेते उपस्थित असल्याचे समजते.उत्तर प्रदेशात गंगेत शेकडो मृतदेह तरंगताना आढळल्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारची प्रतिमा मलीन झाली होती. तर राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारलाही कोरोना हाताळणीतील अपयशावरुन प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. यामुळे सरकार आणि पर्यायाने भाजपची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीरपणे पावले उचलायला सुरुवात केल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

गंगेत प्रेतांचा खच हा राम मंदिरा इतकाच महत्त्वाचा मुद्दा, मोहन भागवतांनी भाष्य करावं; संजय राऊतांचं आवाहन

हरियाणात 10,000 शेतकऱ्यांचं शक्तिप्रदर्शन, अखेर भाजप सरकारनं 350 शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले

भाजप-आरएसएसची गुप्त बैठक; उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीवर खलबतं?

(PM Narendra Modi and Amit Shah starts preparation for UP assembly Elections 2022)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.