पंतप्रधान मोदी-पवार भेट बँकिंग क्षेत्राच्या प्रश्नाबाबत, भेटीबाबत काँग्रेस, मुख्यमंत्र्यांनाही कल्पना, राष्ट्रवादीकडून स्पष्ट
नागरी सहकारी बँकांचे अधिकार कमी करुन रिझर्व्ह बँकेला जादा अधिकार देण्यात आले आहेत. त्याबाबत पंतप्रधान मोदी आणि पवार यांच्यातील बैठकीत चर्चा झाल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलंय.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत पवार आणि मोदी यांच्यात तासभर चर्चा झाली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही भेट नवं सहकार खातं आणि बँकिंग क्षेत्राच्या प्रश्नावर झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर या भेटीत राजकीय चर्चा झाली अशू शकते, असं मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. (PM Modi and Pawar meet on banking sector issues, Information of Nawab Malik)
शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी आणि लष्करप्रमुखही उपस्थित होते. या भेट देशाच्या संरक्षण विषयावर चर्चा झाली. दुसरीकडे नागरी सहकारी बँकांचे अधिकार कमी करुन रिझर्व्ह बँकेला जादा अधिकार देण्यात आले आहेत. त्याबाबत पंतप्रधान मोदी आणि पवार यांच्यातील बैठकीत चर्चा झाल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आणि पवारांची भेट झाली नसल्याचंही मलिक म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना कल्पना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना कल्पना होती अशी माहितीही मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. कोरोना संकटाच्या काळात ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. लसीच्या योग्य पुरवठ्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, भ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.
राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना.#Livehttps://t.co/3usgLi5s0w
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 17, 2021
प्रत्येक भेटीत राजकारण का काढता? – राऊत
शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत. ते कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे ते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा त्यात राजकारण का काढता?, असा सवाल करतानाच पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात. त्यामुळे यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी हा सवाल केला. पवार-मोदींची राजकीय भेट आहे, असं मला वाटत नाही. या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रावर चर्चा झाली असेल. पवार हे देशाचे प्रमुख नेते आहेत. सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते पंतप्रधानांना भेटतात तेव्हा तुम्ही त्यात राजकारण का काढता? पवार हे मोदींना भेटत असतात. प्रत्येक भेटीत राजकारण असत नाही, असं त्यांनी सांगितलं.
Met the Hon. Prime Minister of our country Shri Narendra Modi. Had a discussion on various issues of national interest.@PMOIndia pic.twitter.com/AOp0wpXR8F
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
संबंधित बातम्या :
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं
PM Modi and Pawar meet on banking sector issues, Information of Nawab Malik