…मग पवार गप्प का? : नरेंद्र मोदी

अहमदनगर : तुम्हाला देशात दोन पंतप्रधान मान्य आहेत का? जम्मू-काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांची लाज आणणारी वक्तव्य, हीच विरोधकांची ओळख आहे, असाही निशाणा पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर साधला. या सभेत पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षातील कामांचा पाढा […]

...मग पवार गप्प का? : नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

अहमदनगर : तुम्हाला देशात दोन पंतप्रधान मान्य आहेत का? जम्मू-काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांची लाज आणणारी वक्तव्य, हीच विरोधकांची ओळख आहे, असाही निशाणा पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर साधला. या सभेत पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षातील कामांचा पाढा वाचतानाच, शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

“देशाला दोन पंतप्रधान हवेत, या विषयावर शरद पवार गप्प का? शिवरायांच्या राज्यातील शरद पवारांना फुटीरतावादी काँग्रेसला साथ देताना झोप कशी येते? काँग्रेस फुटीरतावाद्यांसोबत आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही. मात्र, शरद पवार यांना काय झाले, ते यांच्यासोबत कसे? शरद पवारांनी देशाच्या स्वाभिमानाच्या कारणावरून काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा त्यांच्यासोबत कशी काय हातमिळवणी करता. आपणही विदेशी नजरेतून देशाकडे पाहता का? आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी ही केवळ धुळफेक आहे का?”, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केला.

अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे भाजप उमेदवार सदाशीव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुजय विखे पाटील, सदाशीव लोखंडे, बबनराव पाचपुते, राम कदम यासंह भाजपचे मोठे नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांचे लाज वाटणारे वक्तव्य, ही विरोधकांची ओळख – मोदी
  • इतिहास साक्षी आहे, भारतात स्वराजाची संकल्पना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवली – मोदी
  • जो पैसा मध्य प्रदेश सरकारला कुपोषण निर्मुलनासाठी दिला, तोच पैसा काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे – मोदी
  • काँग्रेस हटाव, तरच देश पुढे जाईल – मोदी
  • पुन्हा सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र जलमंत्रालय स्थापन करणार – मोदी
  • लहान शेतकऱ्यांना नियमित पेन्शन देण्याचा संकल्प आहे – मोदी
  • पशू-पालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास आम्ही सुरु केलंय – मोदी
  • ऊस शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न आहे – मोदी
  • गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील लाखो-कोट्यवधी गरिबांना पक्की घरं मिळाली, पक्की शौचालयं मिळाली – मोदी
  • देश सुरक्षित राहिला, तर देशातील नागरिकांचे हित सुरक्षित राहतील – मोदी
  • शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल? – मोदी
  • जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत – मोदी
  • नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी
  • राष्ट्रीयता काय असते, सुरक्षा काय असते, हे दाखवून देणाऱ्या मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील – मुख्यमंत्री
  • विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचे लहान बंधू राजेंद्र विखे आणि निकटवर्तीय आण्णासाहेब म्हस्के हे सुद्धा मोदींच्या व्यासपीठावर
  • सुजयच्या रुपाने काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक केलाय – मुख्यमंत्री
  • राष्ट्रवादीचे ओपनिंग कॅप्टन परत गेले, अशी अवस्था विरोधकांची, दुसरीकडे आपण सुजयच्या रुपाने युवा बॅट्समन उतरवलाय – मुख्यमंत्री
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल
  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले लाईव्ह
  • नगरमधील मोदींच्या सभेत दिलीप गांधींची नाराजी, बोलताना थांबण्यास सांगितल्याने समर्थकांची घोषणाबाजी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी मनधरणी केल्याने दिलीप गांधींचं पुन्हा भाषण सुरु
  • मोदींच्या सभेत भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधींचा व्यासपीठावर गोंधळ, दिलीप गांधी बोलत असताना  थांबण्यास सांगितल्याने नाराजी, मला बोलू देणार नाही का, बोलू देणार नाही तर मतं कशी मागणार?, दिलीप गांधींचा सवाल
  • नगराध्यक्ष योगिता शेळके, संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे, गटनेते जालिंदर वाकचौरे, शिवाजी गोंदकर यांच्याकडून मोदींचं स्वागत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने नगरकडे रवाना
  • मोदींच्या उपस्थिती राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार? थोड्याच वेळात मोदी नगरमध्ये दाखल होतील
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये सभास्थळी दाखल, राम शिंदे, सुजय विखे पाटील आणि सदाशिवराव लोखंडे व्यासपीठावर उपस्थित
  • शिर्डी विमानतळावर चोख बंदोबस्त
  • पंतप्रधान मोदी यांचं शिर्डी विमानतळावर आगमन, मोदी शिर्डीहून हेलिकॉप्टरने नगरकडे सभेसाठी रवाना होणार
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने विळद घाटात विखे यांच्या शिक्षण संस्थेत दाखल, काँग्रेसचे स्टार प्रचारक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित, दोघांनी नाश्ता केल्याची माहिती
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.