पाच वर्षात नरेंद्र मोदींचं उत्पन्न दुप्पट, पत्नी जशोदाबेन यांची संपत्ती किती?

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणासी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रही सादर केलं. या प्रतिज्ञापत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक माहिती आणि संपत्ती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक उत्पन्न गेल्या पाच वर्षात दुप्पट झालं आहे. पंतप्रधान मोदींचं 2013-14 चं वार्षिक उत्पन्न […]

पाच वर्षात नरेंद्र मोदींचं उत्पन्न दुप्पट, पत्नी जशोदाबेन यांची संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणासी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रही सादर केलं. या प्रतिज्ञापत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक माहिती आणि संपत्ती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक उत्पन्न गेल्या पाच वर्षात दुप्पट झालं आहे. पंतप्रधान मोदींचं 2013-14 चं वार्षिक उत्पन्न 9 लाख 69 हजार 711 रुपये एवढं होतं, आता म्हणजे 2017-18 चं मोदींचं वार्षिक उत्पन्न 19 लाख 92 हजार 520 रुपये आहे.

पत्नीची माहिती ‘माहित नाही’

मोदींनी प्रतिज्ञापत्रात पत्नी जशोदाबेन यांच्या नावाच उल्लेख केला आहे. मात्र, त्यांचा पॅन कार्ड नंबर आणि उत्पन्न या रकान्यात ‘माहित नाही’ असा उल्लेख केला आहे. किंबहुना, प्रतिज्ञापत्रात जिथे जिथे पत्नीच्या शिक्षण, व्यवसाय, संपत्ती इत्यादी गोष्टींबाबत माहिती विचारण्यात आली आहे, तिथे तिथे ‘माहित नाही’ असेच उल्लेख करण्यात आला आहे.

मोदींचं वर्षनिहाय उत्पन्न :

  • 2013-14 : 9 लाख 69 हजार 711 रुपये
  • 2014-15 : 8 लाख 58 हजार 780 रुपये
  • 2015-16 : 19 लाख 23 हजार 160 रुपये
  • 2016-17 : 14 लाख 59 हजार 750 रुपये
  • 2017-18 : 19 लाख 92 हजार 520 रुपये

राजकीय पदांमुळे मिळणारा सरकारी पगार आणि बँकांमधील ठेवींवरील व्याज या दोन मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पैसा मिळतो.

  • स्थावर मालमत्ता – 1 कोटी 10 लाख रुपये
  • जंगम मालमत्ता : 1 कोटी 41 लाख 36 हजार 119 रुपये

जंगम मालमत्तेचं विवरण :

  • रोख रक्कम – 38 हजार 750 रुपये
  • बँकेतील ठेवी – 1 कोटी 27 लाख 85 हजार 717 रुपये
  • गुंतवणूक – 20 हजार रुपये (एल अँड टीचे बाँड)
  • गुंतवणूक –7 लाख 61 हजार 466 रुपये (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट)
  • गुंतवणूक –1 लाख 90 हजार 347 रुपये (एलआयसी)
  • दागिने – 45 ग्रॅमच्या सोन्याच्या 4 अंगठ्या (किंमत – 1 लाख 13 हजार 800 रुपये)
  • इतर – 85 हजार 145 रुपये (टीडीएस) आणि 1 लाख 40 हजार 895 रुपये (पीएमओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिक्षण

  • एसएससी (1967) – एसएससी बोर्ड, गुजरात
  • बीए (1978) – दिल्ली यूनिव्हर्सिटी, दिल्ली
  • एमए (1983) – गुजरात यूनिव्हर्सिटी, अहमदाबाद
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.