PM Narendra Modi : ‘कितीही वाईट माणूस असेल, पण त्याच्याकडे…’, काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi : "देशात जी रिजनल पॉलिटिकल एस्पिरेशन आहे. त्याला सन्मान मिळाला पाहिजे. तसं नॅशनल पॉलिटिक्स व्हावं. कोणतीही मोठी राजकीय पार्टी असो. त्यांनी प्रादेशिक पक्षाला तेवढंच मोठं स्थान दिलं पाहिजे. आमच्यासोबत कोणी आलं तर त्यांना आम्ही सोबत घेत आहोत" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi : 'कितीही वाईट माणूस असेल, पण त्याच्याकडे...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 9:24 AM

“घराणेशाही पक्ष आणि लोकशाहीवादी पक्ष यात फरक असतो. मला माझ्या पक्षाचा विस्तार करायचा आहे. माझ्या ज्या आयडिया आहेत, त्याच्याशी कोणी जोडले जात असेल, तर त्यांना आम्ही सोबत घेतो. नवा विचार आणि प्रवाह जर आम्ही येऊ दिला नाही, तर आम्ही सुद्धा संकुचित होऊ शकतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी मुलाखत घेतली. त्यात पंतप्रधान मोदींनी हे म्हटलं. “आम्हाला प्रत्येकवेळी मैदानात राहिलं पाहिजे. एसीत राहिलो असं चालत नाही. भाजप फायदा करेल असं वाटतं, त्यांचं स्वागत आहे. कितीही वाईट माणूस असेल त्याच्याकडेही काही तरी देण्यासारखं असतं, त्यांना आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आघाडीच्या मुद्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. “आघाडीला निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवू नका. देशात विविधता आहे. आपली फिलॉसॉफी काय आहे? देशात जी रिजनल पॉलिटिकल एस्पिरेशन आहे. त्याला सन्मान मिळाला पाहिजे. तसं नॅशनल पॉलिटिक्स व्हावं. कोणतीही मोठी राजकीय पार्टी असो. त्यांनी प्रादेशिक पक्षाला तेवढंच मोठं स्थान दिलं पाहिजे. आमच्यासोबत कोणी आलं तर त्यांना आम्ही सोबत घेत आहोत. आमच्याकडे बहुमत असतानाही टीडीपी आणि शिवसेना आमच्यासोबत होती. रिजनल पार्टीची लढाई राज्यात असते. त्यांची रणनीती स्टेटच्या हिशोबाने होते. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो. आम्हाला राज्याचं भलं हवं असतं. आम्ही काँग्रेससारखा अहंकार ठेवत नाही. आम्ही सर्वांना घेऊन जात असतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अनेक वर्षानंतर ही मोठी रॅली झाली

“फायदा, नफ्यासाठी आम्ही युती करत नाही. ती आमची फिलॉसॉफी नाही. प्रॅक्टिकल गोष्ट असेल, तर करतो. मी आंध्रप्रदेशात मोठी रॅली केली. चंद्राबाबू होते. अनेक वर्षानंतर ही मोठी रॅली झाली होती. तेव्हाच जाणवलं परिवर्तनाच्या मूडमध्ये लोक आहेत. लोकसभेत स्थिर सरकार हवं असं त्यांना वाटतं. दोन विभागात हे मतदार विभागले होते. एक म्हणजे राज्यात परिवर्तन करणं आणि दुसरं म्हणजे लोकसभेत सरकारला किती मजबूत करायचं” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.