भाजपा का बाबा बंगाली!, चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, जटिल समस्याका थाली बजाके इलाज; राष्ट्रवादीने डिवचले

पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येताच सर्वांना मोफत सोविड लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. (PM Narendra Modi is Baba Bengali of BJP, says ncp)

भाजपा का बाबा बंगाली!, चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, जटिल समस्याका थाली बजाके इलाज; राष्ट्रवादीने डिवचले
Narendra Modi
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 3:55 PM

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येताच सर्वांना मोफत सोविड लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. भाजपच्या या घोषणेवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट बाबा बंगाली ठरवले आहे. राष्ट्रवादीने नाव न घेता मोदींवर निशाणा साधला आहे. (PM Narendra Modi is Baba Bengali of BJP, says ncp)

बंगाल भाजपने एक ट्विट करून सत्तेत येताच पश्चिम बंगालमधील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. इंग्रजीत हे ट्विट करतानाच मोदींचा फोटोही ट्विट केला आहे. त्यावर बंगालीतून कोरोनाची लस मोफत देण्याविषयी म्हटलं आहे. भाजपच्या या ट्विटला रिट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपा का बाबा बंगाली! चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, किया कराया? तुरन्त काट! पोलिटिकल दुश्मन से छुटकारा, इलेक्शन में धोखा, गठबंधन में चोट-निसंकोच संपर्क करें, पार्टी में अनबन? किसानों कि कर्जामुक्ती, आंदोलन यात्रा में रुकावट, जटिल समस्याका थाली बजाके इलाज, गोल्ड मेडालिस्ट (वाराणसी), असं ट्विट करत राष्ट्रवादीने मोदी तसेच भाजपची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादीच्या या खोचर ट्विटमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ममतादीदींचंही आश्वासन

पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांच्या निवडणुकांसाठी मतदान झालं आहे. अवघ्या दोन टप्प्यांचं मतदान बाकी आहे. या दोन टप्प्यांसाठी 26 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच 2 मे रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. त्यामुळे या दोन टप्प्यात जास्तीत जास्त सीट पदरात पाडून घेण्यासाठी थेट भाजपने सर्वांनाच मोफत कोरोनाची लस देण्याचं जाहीर केलं आहे. भाजपच्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सत्तेत आल्यावर सर्वांना कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी एका रॅलीत ही घोषणा केलाी होती. आमचं सरकार 5 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत कोरोनाची लस टोचणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.

रुग्णसंख्या वाढली

निवडणूक प्रचार सुरू असतानाच बंगालमध्ये अचानक कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. राज्यात 11 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या बंगालमध्ये 68 हजार रुग्णांवर उपचार सुरू असून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7 लाखांवर पोहोचली आहे. (PM Narendra Modi is Baba Bengali of BJP, says ncp)

संबंधित बातम्या:

PM Modi Meeting | देशातील कोरोनास्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींच्या मॅरेथॉन बैठका, चार तासात तीन बैठकांचे आयोजन

मोदींचाही बंगाल दौरा रद्द, उच्च स्तरीय बैठक बोलावली, राहुलजींच्या पावलावर पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद, काँग्रेसची प्रतिक्रिया

‘खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात’, राहुल गांधी गरजले

(PM Narendra Modi is Baba Bengali of BJP, says ncp)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.