नैराश्याने ग्रासलेले लोक माझी कबर खोदण्यास निघालेत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या 44 व्या स्थापना दिनानिमित्ताने दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयातून संवाद साधला. त्यांनी भाजपच्या देशभरातील 10 लाख सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

नैराश्याने ग्रासलेले लोक माझी कबर खोदण्यास निघालेत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
PM Narendra ModiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 11:08 AM

नवी दिल्ली : द्वेषाने पछाडलेले लोक आज वारंवार खोटं बोलत आहेत. हे लोक नैराश्याने ग्रासले आहेत. त्यामुळेच ते मोदी तुमची कबर खोदू असं म्हणत आहेत. ते माझी कबर खोदण्याच्या कामाला लागले आहेत. पण दलित, आदिवासी, महिला, माता, तरुण आणि गरीब लोक भाजपच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. भाजपचं कमळ फुलवत आहेत, हे या लोकांना माहीत नाहीये, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला आहे. आज भाजपचा 44 वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पार्टी कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला.

नवी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील दहा लाख पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. देशभरात मोदींचं भाषण लाइव्ह दाखवण्यात आलं होतं. यावेळी मोदींनी सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. राक्षसांचा सामना करताना हनुमान कठोर झाले. अशाच प्रकारे भ्रष्टाचार, घराणेशाहीशी लढायचं असेल तर कठोर व्हावं लागणार आहे, असं मोदी म्हणाले. भारताचं संरक्षण करण्यासाठी भाजप कटिब्ध आहे. भारताच्या संरक्षणासाठी कठोरातील कठोर पाऊल उचलण्यात भाजप मागे पुढे पाहणार नाही. घराणेशाही मोडीत काढण्यासाठी हनुमानासारखं कठोर व्हावं लागतं. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र घेऊनच भाजप मार्गक्रमण करत आहे. देशाच्या नावावर राजकारण करणं ही भाजपची संस्कृती नाही, असं मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कॅन डू अॅटिट्यूड

कवन सो काज कठिन जग माहीं, जो नहीं होय तात तुम्ह पाही म्हणजे पवनपूत्र हनुमान करणार नाहीत असं कोणतंही काम नाही. लक्ष्मणावर संकट आलं तेव्हा त्यांनी संपूर्ण पहाड उचलला. आजच्या मॉर्डन भाषेत एका शब्दाचा वारंवार उल्लेख केला जातो. तो म्हणजे Can Do Attitude. हनुमानाचं आयुष्य पामहहिलं तर प्रत्येक पावलावर Can Do Attitudeच्या संकल्पशक्तीनेच त्यांना यश मिळवून दिल्याचं दिसून येतं. हाच मंत्र यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो, असंही ते म्हणाले.

ते जातीयवादी राजकारण करतात

देशातील राजकीय पक्ष घराणेशाही, वंशवाद, जातीवादाचं राजकारण करतात. पण भाजपचं हे कल्चर नाही. आपण सर्वांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. देशातील माता, भगिनींचा विश्वास भाजपच्या दिशेने वाढला आहे, असं सांगतानाच 2014नंतर केवळ सत्ता बदल झाला नाही. तर एक नवीन सुरुवात झाली. या लोकांनी नेहमीच देशातील जनतेला गुलाम बनवलं. या सर्व बादशाही मानसिकतेच्या लोकांना जनतेने सत्तेतून हद्दपार केलं आहे, असंही ते म्हणाले.

त्यांनी खिल्ली उडवली

2014 पूर्वी या देशात बादशाही मानसिकता होती. नवं सरकार आलं. आम्ही अनेक प्रोग्राम हाती घेतले. आमची थट्टा उडवली गेली. जेव्हा मी लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियान आणि महिलांसाठी शौचालये बांधण्याची घोषणा केली. त्यावर या लोकांनी (काँग्रेस) माझ्यावर टीका केली. त्यांना हे आवडलं नाही. हे द्वेषाने पछाडलेले लोक आहेत. वारंवार खोटं बोलत आहेत. हे लोक एवढे हताश झाले आहेत की ते सातत्याने द्वेष निर्माण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.