‘स्वातंत्र्याची भीक नको’ म्हणालेल्या नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण! वाचा काय असतो होलोग्राम पुतळा?
Netaji Subhash chandra Bose : इंडिया गेटवर बसवण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनही केलं. यावेळी त्यांनी नेताजींच्या देशप्रेमाबद्दल वक्तव्य करताना त्यांच्या कार्याला अभिवादनही केलं.
नवी दिल्ली : दिल्लीत आज (रविवार, 23 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम (Netaji Subhash Chandra Bose Hologram Statue) पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. इंडिया गेटवर बसवण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनही केलं. यावेळी त्यांनी नेताजींच्या देशप्रेमाबद्दल वक्तव्य करताना त्यांच्या कार्याला अभिवादनही केलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती असून त्यानिमित्त या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल देण्यात येणारा नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं आहे. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच नेताजींचा भव्य पुतळा उभारला जाईल, असं आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे नेताजींनी स्वातंत्र्यासाठी कधीच इंग्रजांपुढे भीक मागितली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
होलोग्राम पुतळा म्हणजे काय?
होलोग्राम हे एक प्रकारचं डिजिटल तंत्रज्ञान आहे. ते एका प्रोजेक्टरप्रमाणे काम करतं. या तंत्रज्ञानाचा वापर करुन थ्री डी आकृती तयार करता येते. या तंत्रज्ञानामुळे आभासी प्रतिकृती तयार होते. ही प्रतिकृती जिवंत पुतळ्यासारखी असल्याचाच भास होतो. होलोग्राम पुतळा हे आधुनिक तंत्रज्ञानानं साकारलेलं एक अद्भूत रसायन आहे.
PM Shri @narendramodi unveils hologram statue of Netaji Subhas Chandra Bose on #ParakramDiwas. https://t.co/MIONH9aqYx
— BJP (@BJP4India) January 23, 2022
लवकरच खराखुरा पुतळा उभारणार
दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं जरी आज अनावरण करण्यात आलं असलं तरिही लवकरच त्यांच्या ग्रॅनाईट पुतळ्याचंही काम सुरु करण्यात येणार नाहे. ग्रॅनाईट दगडापासून तब्बल 28 फूट इतका भव्य पुतळा लवकरच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा साकरला जाईल, असंही मोदींनी आजच्या या कार्यक्रमात म्हटलंय. 1968 साली हटवण्यात आलेल्या जॉर्ज पंचम यांच्या पुतळ्याच्या जागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम पुतळा सध्या साकारण्यात आला आहे.
Delhi: PM Narendra Modi unveils hologram statue of Netaji Subhas Chandra Bose at India Gate on his 125th birth anniversary #ParakramDiwas pic.twitter.com/9wnhGLPNZH
— MeghUpdates?™ (@MeghBulletin) January 23, 2022
पुरस्कारांचं वितरण
2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांसाठीच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या योगदानातील महत्त्वपूर्ण बोस पुरस्कारांचंही वितरण यावेळी करण्यात आलं. यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात करता मोदींनी नेताजींच्या कार्याला नमन केलं. नेतांजींनी एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि प्रेरणा काय असते, हे आपल्याला शिकवलं, असंही मोदींनी म्हटलंय. स्वातंत्र्य मला भीक म्हणून नको आहे, मी ते मिळवेन, अशा ठाम मताचे नेताजी होते, असंही मोदी म्हणालेत. सरकारनं नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचं ठरवलं आहे, असं देखील यावेळी मोदींनी जाहीर केलं.
संबंधित बातम्या :
‘बाळासाहेब असते तरी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता!’, अशोक चव्हाणांचा दावा
मोठी राजकीय अपडेट! मुंबई पालिकेसाठी भाजप मनसेसोबत युती करणार? फॉर्म्युलाही ठरला?