Pm Modi Speech Live : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे एकाच मंचावर तर दुसकीकडे नवा वाद पेटला

| Updated on: Jun 14, 2022 | 8:01 PM

PM Narendra Modi Visit Pune Dehu Sant Tukaram Temple And Mumbai BKC Live Updates and Latest News : नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. त्याचबरोबर अनेक उद्धघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

Pm Modi Speech Live :  पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे एकाच मंचावर तर दुसकीकडे नवा वाद पेटला
पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागतImage Credit source: tv9

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे-मुंबईत त्यांच्या हस्ते आज उद्धघाटन करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा ते पुण्यात येणार आहेत. तिथं ठरलेल्या नियोजित वेळेत कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याची चर्चा होती. पण मुख्यमंत्री होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jun 2022 07:11 PM (IST)

    बीकेसीतून पंतप्रधान मोदी Live

    केसरीने स्वातंत्र्याच्या लढ्याला धार दिली

    गुजराती पत्रकारिताही मजबूत बनत होती

    गांधींनीही आपला पहिला पेपर इंडियन ओपिनिय सुरू केला होता

    स्वातंत्र्य लाढा असू किंवा लोकशाहीची स्थापना यात पत्रकारितेचं मोठं योगदान राहिलं आहे

    यात गुजराती भाषेतील पत्रकारितेनेही मोठी कामगिरी केली आहे

    शिक्षणाला स्थानक भाषेची जोड देण्याचा हा प्रयत्न आहे

    बेस्ट कंटेटच्या निर्मितीवर अलिकडच्या काळात भर दिला जातो आहे

    जे धोर समोर ठेवून हा पेपर सुरू केला त्याला आणखी मजबुती दिली

    भारताचा इतिहास आपल्याला खूप काही शिवकवलं आहे

    सर्वांना समान व्यासपीठ या भारताना दिलं आहे

  • 14 Jun 2022 07:08 PM (IST)

    बीकेसीतून पंतप्रधान मोदी Live

    मुंबई समाचारची दोनशे वर्षे पूर्ण होताना याच वर्षी आला आहे

    हे देशातील पत्रकारितेची शोभा वाढवणारा हा क्षण आहे

    मुंबई समाचार हे फक्त वृत्तपत्र नाही

    भारत वेळेबरोबर बदलत गेला आहे मात्र आपली मूळ तत्व बदलली नाहीत

    प्रत्येक काळच्या नव्या बदलांना या वृत्तपत्राने जपले आहे

    मुंबई समाचार सुरू झाला तेव्हा गुलामी वाढली होती

    तेव्हा असा पेपर काढणं सोपी गोष्ट नव्हती

    याने दुसऱ्या भाषेतील वृत्तपत्रांना प्रोत्साहन दिले

    देशभरात पत्रकारितेची विस्तार झाला

  • 14 Jun 2022 07:03 PM (IST)

    बीकेसीतून पंतप्रधान मोदी Live

    मुंबई समाचारच्या सर्वांचे या ऐतिहासिक क्षणासाठी अभिनंदन

    मुंबई समाचारने स्वातंत्र्याच्या आवाजालाही आवाद दिला

    भाषेच माध्यम गुजराती असले तरी प्रभाव हा संपूर्ण भारतानावर होता

    तेव्हाही या वृत्तपत्राने आपली वाचकांशी नाळ तुटू दिली नाही

    झपाट्याने बदलणाऱ्या जमान्यात अशा गोष्टी समोर आल्यावर मुंबई समाचारच्या दोनशे वर्षे पूर्ण करण्याचे महत्व कळते

  • 14 Jun 2022 06:54 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    100 वर्षांनी मोदींच्या हस्ते लोकार्पण होत राहवं

  • 14 Jun 2022 06:45 PM (IST)

    पंतप्रधान मोदी यांच्या देहू दौऱ्यातले फोटो

  • 14 Jun 2022 06:38 PM (IST)

    पंतप्रधान मोदी यांचा बीकेसीत सत्कार

    मुंबई समाचार वृत्तपत्राचा 200 वार्धापण दिन

  • 14 Jun 2022 06:32 PM (IST)

    अनिल बोंडेंकडून पंतप्रधान मोदींचं स्वागत

  • 14 Jun 2022 06:31 PM (IST)

    क्रांतीगाथांचा मोदींकडून मराठीत उल्लेख

  • 14 Jun 2022 06:28 PM (IST)

    सावरकरांच्या वीरतेचं स्मरण होतंय-मोदी

  • 14 Jun 2022 06:06 PM (IST)

    भाजपच्या तुषार भोसले यांची टीका

    – सुप्रियासुळे सध्या सेनेच्या जवळ गेल्या आहेत, त्यामुळे आम्ही म्हणजे महाराष्ट्र असं त्यांना कदाचित वाटत असेल

    – फडतूस माणसाबद्दल मला बोलायचं नाहीय, अमोल मिटकरींना तुषार भोसलेचे प्रत्युत्तर

    – तीन तासांचा कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त दीड तास करण्यात आला

    – या तीन तासात कार्यक्रम माझेही आभार भाषण होते तेही वगळण्यात आले

    -याला राजकीय रंग देण्याचं काम करू नये

  • 14 Jun 2022 06:04 PM (IST)

    मोदींच्या स्वागतासाठी भाजप नेते

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईमध्ये भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक, आशिष शेलार यांच्यासहीत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते करणार स्वागत..

    वांद्रे सिलिंक जवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचा कार्यक्रम..

    स्वागता साठी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते जमले

  • 14 Jun 2022 05:52 PM (IST)

    मुंबईतून पंतप्रधान मोदी Live

    स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण येते

    राजभवनातील बंकरचा पत्ता 75 वर्षांनी लागला आहे

    अनेक लोकांनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं आहे

    प्रत्येक दिवशी हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लढा उभारला गेला

  • 14 Jun 2022 05:43 PM (IST)

    मुंबईतून पंतप्रधान मोदी Live

    सर्वांचा उद्देश हा भारताचे स्वातंत्र्य हाच होता

    भारताच आंदोलन हे ग्लोबल आंदोलन होतं

    भारताने अनेक देशांना स्वातंत्र्यासाठी प्रेरणा दिली आहे

    ही गॅलरी अनेकांना प्रेरणा देणारी प्रेरणास्थान बनेल

    इतर शहरातही स्थानिक सुविधा वाढवण्यावक भर देत आहोत

    आपण आपल्या विरासतीसाठी उदासीन होतो

    हा अमृत मोहत्सव एक कारण बनला पाहिजे

    गुजरातमध्येही लंडनसारखेच इंडिया हाऊस बनवले आहे

  • 14 Jun 2022 05:40 PM (IST)

    मुंबईतून पंतप्रधान मोदी Live

    या भवनाने स्वातंत्र्यकाळातही महत्वाची भूमिका बजावली आहे

    राज्यातली अनेक क्षेत्रांनी देशाला प्रेरणा दिली आहे

    तुकाराम महाराजांपासून आंबेडकरांनी अनेकांनी योगदान दिलं आहे

    आपल्या संतांनीही देशाच्या जडघडणीत मोठं योगदान दिलं आहे

    स्वातंत्र्यांचा काळ आठवल्यास महाराष्ट्राने अनेक योद्धे दिले आहेत

    वीर सावरकरांनी अनेक योजना या स्वातंत्र्यासाठी आखल्या आहेत

    स्थानिक लेव्हलच्या गोष्टींचा प्रभाव हा  राष्ट्रीय स्तरावर पडत होता

    लोकमान्य टीळक, चाफेकर बंधू, यांनी वेगवेगळ्या मार्गाने लढा दिला

  • 14 Jun 2022 05:37 PM (IST)

    मुंबईतून पंतप्रधान मोदी Live

    आज वटपौर्णिमाही आहे आणि संत कबीरांची जयंतीही आहे

    मला याठिकाणी आल्याचा आनंद आहे

    महाराष्ट्राचे राजभवन अनेक घटनांची साक्ष आहे

    नवं भवन महाराष्ट्रातील जनतले नवी ऊर्जा देणारे असावे

    हे राजभवन नाही लोकभवन आहे, हे खरं ठरावं

    यात महाराष्ट्राच्या महान परंपरा आहेत

  • 14 Jun 2022 05:29 PM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Live

    राज्यपाल भवन हो लोकभवन राहवं

    राज्यभवनात पोहोचण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकता असते

    आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबाबत मोदींचे आभार

    भाषेची संस्कृती ही जपली गेली पाहिजे

    तुम्ही मराठीत भाषणं करा आणि मराठीत संचलन करा

    देशात अनेक योजना अनेक वर्षांपासून सुरू

    औरंगाबादेतले लोक मला पाण्याच्या समस्येबाबत भेटले

    ती समस्या सोडवली जावी

    मला विश्वास आहे, मोदी है तो मुमकीन है

    स्नेह, प्रेम, विश्वासात खूप ताकद है

    उत्तराखंडमध्ये सर्व काही आहे मात्र समुद्र नाही

    याठिकाणीही सर्व काही आहे मात्र हिमालय नाही

  • 14 Jun 2022 05:17 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    हे स्वातंत्र्या आपण उपभोगतो आहोत ते मिळवण्यासाठी अनेकांनी यातना सोसल्या

    हे घडलं नसतं तर आपण याठिकाणी येऊ शकतो असतो का?

    आपल्या काही गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला द्यायच्या आहेत

    अन्यथा आपण आपल्या कर्तव्याल मुकत आहोत

    मला या उद्घाटनाला बोलवल्याबद्दल धन्यवाद

    मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

  • 14 Jun 2022 04:22 PM (IST)

    पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

  • 14 Jun 2022 04:08 PM (IST)

    पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर येणार

    मोदींच्या हस्ते गॅलरीचं उद्घाटन होणार

    पंतप्रधान मोदी राजभवनाकडे रवाना

  • 14 Jun 2022 03:31 PM (IST)

    पंतप्रधान मोदी मुंबईकडे रवाना

    मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार

  • 14 Jun 2022 03:15 PM (IST)

    पालखी मार्ग ते बाबासाहेब, वीर सावरकर, नरेंद्र मोदींच्या देहु दौऱ्यातल्या भाषणातले 10 मोठे मुद्दे

    श्री विठ्ठलाय नम, नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदिपा.. नमो भास्करा ज्ञानमूर्ती. मस्तक या पायावरी या संताच्या.. संतांची अनूभूती झआली तर इश्वराची अनुभूती होते. देहूच्या तीर्थक्षएत्रावर येण्याचं सौभाग्य मिळालं, आणि मी हाच अनुभव घेतो आहे. देहू संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. देहूत पांडुरंग नांदतो. देहूत पांडुरंगांचा निवास आहे, आमि प्रत्येक जण भक्तीने ओतपोत संत स्वरुप आहे.

    म्हणून नागरिक, माता, भगिनींना नमन करतो. काही दिवसांपूर्वी पालखी मार्ग फोर लेन करण्यासाठी उद्घाटन करण्याचा मान मिळाला. तीन चरणात काम पूर्ण होईल. ३५० किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे होतील. ११ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करमार,. या क्षेत्राता विकास होईल. ज्या शिळेवर तुकाराम महाराांनी १३ दिवस तपस्या केली असेल.

    ती शीळा फक्त शीळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शीळा आहे. या क्षेत्राच पुननिर्माण करण्यासाठी आभार व्यक्त करतो. संताजी जगदाडे यांनाही नमन करतो. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. जगातील प्राचीन सभ्येततील एक आहोत. याचे श्रेय संत आणि ऋषिंना . भारत शाश्वत आहे कारण संतांची भूमी आहे. प्रत्येकवेळी मार्गदर्शनसाठी इथे सत्परुष जन्माला आले आहेत. संत ज्ञानेश्वर समाधींचे ७२५ वर्ष आहे. यांच्यामुळेच भारत गतीशील आहे. बहिणाबाईंनी संत तुकारामांना संतांचे कळस म्हटले आहे.

    तुकारामांनी दुष्काळ पाहिला, दुख पाहिले, भूकबळी पाहिले. संत तुकाराम त्यावेळी समाजासाठीच नव्हे तर भविष्यासाठी प्रकाश म्हणून राहिले. ही शीळा त्यांच्या वैराग्याची साक्ष आहे. तुकरामा दया आणि करुणेचा ठेवा अभंगांत आहे. या पिढ्यांनी पीढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही तोच अभंग. आजही देश जेव्हा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जातोय, त्यावेळी तुकारामांचे अभंग प्रेरणा, दिशा देतात. सर्व संतांच्या अभगांनी प्रेरणा मिळते. सार्थ अभगं गाथांनी संत परंपरेचे ५०० अभंग रचना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.

    संत तुकाराम म्हणत उच्च-नीचचा भेदभाव करणे हे पाप आहे. हा उपदेश तितका उपयुक्त धर्मासाठी तितकाच राष्ट्रभक्तीसाठीही आहेच. हाच संदेश घेऊन वारकरी दरवर्षी वारी करतो. त्यातूनच सरकारच्या योजनांचा विना भेदभाव सगळ्यांना मिळतो आहे. जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणजे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकारामांचा अभंग, जेव्हा तुम्ही शेवटच्या रांगेत बसलेल्यांचा विकास करणे, हाच अंत्योदय आहे. समाजातील सर्वात खालच्या स्तरातील सगळ्यांचे कल्याण हाच उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुषअयात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे.

    वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते तुकारामांचे अभंग गात असत. वेगवेगळअया पिढईला तुकारामांचे अभंग प्रेरणा राहिलेल्या आहेत. म्हणूनच नेती नेती असे म्हटले जाते. आषाढात पंढरपूर यात्रा आता सुरु होणार आहे, हा यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यित ठेवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत.

    अयोध्येत राममंदिरही होते आहे. काशी विश्वनाथ स्वरुप बदलले आहे. सोमनाथमध्येही चांगले कार्य झाले आहे. तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांचा विकास केला जातोय. रामायण सर्किट, बाळासाहेब आंबेडकर पंचतीर्थांचाही विकास होतो आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे.. योग्य दिशेने प्रयत्न केले तर असंभवही संभव होऊ शकेल. गरिबांसाठी योजना सरकार राबवते आहे. १०० ट्क्कयांपर्यंत त्या पोहचावयच्या आहेत. पर्यावरण, जलसंवर्धन, नद्यांसाठी प्रयत्न, स्वस्थ भारत हा संकल्प, १०० टक्के पूर्ण करायचे आहे.

    सगळ्यांच्या सहभागाची गरज आहे. प्लास्टिकमुक्तीचा संकल्प, नदी-तलावे साफ करण्याचा संकल्प केला तर देश स्वचंछ राहिल. अमृत सरोवरासाठी संतांनी मदत करावी. प्राकृतिक शेतीला मोहीम म्हणून पुढे नेतो आहे. प्राकृतिक शेती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. योगदिन येतोय, हे संतांचेच देणे आहे. योग दिवस उत्साहाने साजरा कराल. जय जय रामकृष्ण हरी.. हर हर महादेव

  • 14 Jun 2022 03:10 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुषअयात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुषअयात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे. वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते तुकारामांचे अभंग गात असत. वेगवेगळअया पिढईला तुकारामांचे अभंग प्रेरणा राहिलेल्या आहेत. म्हणूनच नेती नेती असे म्हटले जाते. आषाढात पंढरपूर यात्रा आता सुरु होणार आहे, हा यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत. आपली प्राचीन ओळख चैतन्यित ठेवाव्यात. आधुनिक तंत्रज्ञान येत असतानाही विकास आणि विरासत दोन्हींनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालायला हवेत. अयोध्येत राममंदिरही होते आहे.

  • 14 Jun 2022 03:07 PM (IST)

    तीन चरणात काम पूर्ण होईल – मोदी

    श्री विठ्ठलाय नम, नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदिपा.. नमो भास्करा ज्ञानमूर्ती. मस्तक या पायावरी या संताच्या.. संतांची अनूभूती झआली तर इश्वराची अनुभूती होते. देहूच्या तीर्थक्षएत्रावर येण्याचं सौभाग्य मिळालं, आणि मी हाच अनुभव घेतो आहे. देहू संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. देहूत पांडुरंग नांदतो. देहूत पांडुरंगांचा निवास आहे, आमि प्रत्येक जण भक्तीने ओतपोत संत स्वरुप आहे. म्हणून नागरिक, माता, भगिनींना नमन करतो. काही दिवसांपूर्वी पालखी मार्ग फोर लेन करण्यासाठी उद्घाटन करण्याचा मान मिळाला. तीन चरणात काम पूर्ण होईल.

  • 14 Jun 2022 02:58 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

    शिवाजी महाराजांच्या जीवनातही तुकारामांनी महत्वाची भूमिका बजावली आहे

    सावरकर जेलमध्येही तुकारामांचे अभंग म्हणत होते.

    सावरकर हातातील बेड्यांच्या चिपळ्या वाजवायचे

    विविधतेने जगत असताना भारत हजारो वर्ष जागृत राहिला आहे

    आपल्या राष्ट्रीय एकतेला मजबूत करण्यासाठी आपल्या परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे

    आता अधुनिकता ही भारताची ओळख बनू लागले आहे

    पालखी मार्गाचा विस्तार होत असला तरी अयोध्येतही राम मंदिर बनत आहे

    पूर्ण देशात तीर्थक्षेत्रं आणि पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे

    या आठ वर्षात बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थांचा विकास होत आहे

    ही पंचतीर्थ नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत

  • 14 Jun 2022 02:56 PM (IST)

    संत तुकाराम महाराजाना बहिणाबाईंने मंदिराचा कळस म्हटलं होतं – नरेंद्र मोदी

    – संत तुकाराम महाराजाना बहिणाबाईंने मंदिराचा कळस म्हटलं होतं

    – संत तुकाराम महाराज आशेचा किरण बनले

    – अभंगाने आपल्या पिढीला प्रेरणा दिली

  • 14 Jun 2022 02:55 PM (IST)

    पंतप्रधान मोदी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, मारुतीबाबा कुरेकर महाराज यांचे स्वागत

    नितीन महाराज देहूकर – पंतप्रधान मोदी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, मारुतीबाबा कुरेकर महाराज यांचे स्वागत. अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडवण्यात आली. त्यानंतर १३ दिवस अनुष्ठानासाठी बसले होते. चमत्कार झाला. तपोनिधी महाराजांनी १६८५ साली तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा केली, तपोनिधी महाराज म्हणून इथे आलेला आहात. चौपदरीकरणाचे काम मोदींमुळे शक्य झाले.

  • 14 Jun 2022 02:54 PM (IST)

    मनुष्य जीवनातसर्वात दुर्लब संतांचे सतसंग आहे

    – मनुष्य जीवनातसर्वात दुर्लब संतांचे सतसंग आहे

    – ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे तीन टप्प्यात काम होणार

    – तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यात होणार

    – मला आज शिळा मंदिराच्या लोकापर्ण करण्याचे भाग्य मिळले

    – त्या फक्त शिळा नाहीत भक्ती आणि ज्ञानाचे केंद्र आहे

  • 14 Jun 2022 02:52 PM (IST)

    देहूतून पंतप्रधान मोदी Live

    तुकारामांनी त्यांची संपत्ती दान केली

    जो भंग नाही होत, जो वेळेसोबत जीवंत राहतो, तो अभंग असतो

    संत चोखामेळा यांच्या प्राचीन अभंगातून आम्हाला पेरणा मिळते

    सार्थ अभंगगाथेने या संत परिवाराची वर्षानुवर्षेची अभंगरचना सोप्या भाषेत सांगितली आहे

    समाजात उच नीच हा भेदभाव हे खोप मोठं पाप आहे

    त्यांचा उपदेश हा राष्ट्रभक्तीसाठी मोठा आहे

    सरकारी योजनेचा लाभ हा सर्वासाठी विनाभेदभाव मिळतो

    पंढरीची वारी ही समानतेचं प्रतीक राहिली आहे

  • 14 Jun 2022 02:48 PM (IST)

    देहूतून पंतप्रधान मोदी Live

    पालखी मार्गाचे चार पदरीकरण होणार

    ज्ञानेश्वरांचा पालखीमार्ग ४ टप्प्यात पूर्ण होणार

    तुकारामांचा पालखीमार्ग ३ टप्प्यात पूर्ण केला जाणार

    देहू भारताच्या सांस्कृतिक भविष्याला मजबूत करत

    मी मंदिर न्यास आणि भक्तांचे आभार मानतो

    तुकामाराम महारांच्या गाथांना माझा प्रणाम

  • 14 Jun 2022 02:46 PM (IST)

    तुकोबारायांनी शब्दाचे धन दिले जे शब्द कुणी बुडवू शकत नाही – देवेंद्र फडणवीस

    – तुकोबारायांनी शब्दाचे धन दिले जे शब्द कुणी बुडवू शकत नाही,

    – गरीब कल्याणाचा मंत्र रंजले गांजले यांच्यासाठी काम पंतप्रधान मोदी करतायत, खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, जगाला कोरोना काळात लस पुरवण्याचे काम त्यांनी केलं

  • 14 Jun 2022 02:43 PM (IST)

    शीळा मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातच नाही जगात लोकप्रिय असलेले पंतप्रधान मोदी आलेले आहेत – देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस हा अत्यंत अभिमानाचा सोहळा आहे. शीळा मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातच नाही जगात लोकप्रिय असलेले पंतप्रधान मोदी आलेले आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज, संतगण आणि उपस्थित वारकऱ्यांना जय हरी. स्वताला भाग्यशाली समजतो, म्हणून या प्रसंगी मोदींसोबत मला उपस्थित राहता आलं. मी नितीन महाराजांचे आभार मानतो. तुराम महाराजांनी समाजाला दिशा दिली. समाजात नैराश्य होतं. श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धेत समाज लीन होता, शोषण होत होता. भागवत संप्रदायाची पताका घेऊन संतांनी भगवंत संप्रदाय, समाज उभा केला. ज्ञानेश्वरांनी पाया रचला आणि तुकाराम महारांनी कळस रचला. समाजातील सर्व स्तरांपर्यंत, बहुजनांपर्यंत भागवत धर्म नेला.

  • 14 Jun 2022 02:33 PM (IST)

    अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मारूती बाबा कुरेकर यांची उपस्थिती

    अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मारूती बाबा कुरेकर महाराज यांचं सगळ्यांच्यावतीने स्वागत करतो

  • 14 Jun 2022 02:29 PM (IST)

    मोदींच्या सभेसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी

  • 14 Jun 2022 02:26 PM (IST)

    – उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, तुषार भोसले मंचावर उपस्थित

    – उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, तुषार भोसले मंचावर उपस्थित

  • 14 Jun 2022 02:26 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत

    पुणे,दि.14: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले.

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले.

    यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चंद्रकांत पाटील, लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन,पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी यांनीही पंतप्रधान महोदय यांचे स्वागत केले.

  • 14 Jun 2022 02:25 PM (IST)

    मंदीराची पाहणी देखील त्यांनी केली आहे

    मंदीराची पाहणी देखील त्यांनी केली आहे

    मोदींकडून विठ्ठल-रूक्मिणी मातेचं दर्शन

    श्रीरामाचं दर्शन देखील घेतलं

    काहीवेळात सभेच्या ठिकाणी आगमन झालं आहे.

  • 14 Jun 2022 02:21 PM (IST)

    मोदींचं सभेच्या ठिकाणी आगमन

    मोदींचं सभेच्या ठिकाणी आगमन,

    वारकऱ्यांनी केलं उत्साहात स्वागत

    वारकऱ्यांशी मोदींनी संवाद साधला

  • 14 Jun 2022 02:12 PM (IST)

    सभेला मोठी गर्दी

  • 14 Jun 2022 02:11 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची देहू’वारी’,सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची देहू’वारी’,सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी

    प्रभु श्रीराम चंद्राचं दर्शन घेतलं आहे.

  • 14 Jun 2022 02:08 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची देहू’वारी’,सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची देहू’वारी’,सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी

  • 14 Jun 2022 01:57 PM (IST)

    मोदी तुकाराम महाराज मंदिराच्या दिशेनं रवाना

    मोदी तुकाराम महाराज मंदिराच्या दिशेनं रवाना

    मोदींचं वारकऱ्यांनी स्वागत केलं

    वारकऱ्यांना मोठी आतुरता आहे

    संबोधित करणार आहे

    परंपरा इतिहास आहे

  • 14 Jun 2022 01:47 PM (IST)

    देहुतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण

  • 14 Jun 2022 01:45 PM (IST)

    मोदी विमानाने पुण्यात दाखल

  • 14 Jun 2022 01:43 PM (IST)

    देहू आळंदीचा विकास झाला पाहिजे

  • 14 Jun 2022 01:41 PM (IST)

    नरेंद्र देहूमध्ये दाखल

  • 14 Jun 2022 01:35 PM (IST)

    खासदार सुजय विखे पाटील, चित्रा वाघ, आमदार शिवेंद्रसिंहराजे उपस्थित

    खासदार सुजय विखे पाटील, चित्रा वाघ, आमदार शिवेंद्रसिंहराजे एकत्रित चौपाल –

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येतायत त्याचा खूप आनंद होतोय,

    – वारकऱ्यांप्रमाणे आम्हालाही उत्युकता आहे,

    – वारकाकर्यांचे प्रश्न मोदींनी मार्गी लावल्याबद्दल त्यांचे आभार

  • 14 Jun 2022 01:34 PM (IST)

    मोदींच्या स्वागतासाठी मोठे नेते

  • 14 Jun 2022 01:33 PM (IST)

    मोदींच्या भाषणाची मला मोठी उत्युकता आहे – बंडातात्या कराडकर

    – देशाचे प्रथम नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येणार असल्याने वारकर्यांमध्ये मोठा उत्साह,

    – मोदींच्या भाषणाची मला मोठी उत्युकता आहे,

    – इंद्रायणी नदीच्या निर्मूलनाचे काम मोदींनी हाती घ्यावे , माझी मागणी असणार

  • 14 Jun 2022 01:30 PM (IST)

    लोहगाव विमानतळावर अजित पवारांकडून मोदीचं स्वागत, फोटोची चर्चा

  • 14 Jun 2022 01:26 PM (IST)

    मोदी जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहेत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देहूगावात तयार केलेल्या हेलिपँडवर लँड होतील

    तिथून बायकार ते शिळा मंदिराकडे जाणार आहेत

    मोदी जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहेत

  • 14 Jun 2022 01:25 PM (IST)

    आजची मोदींची महत्त्वपुर्ण बैठक

  • 14 Jun 2022 01:22 PM (IST)

    मोदींचं महाराष्ट्रात स्वागत करण्यात आलं आहे

  • 14 Jun 2022 01:17 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील स्वागतासाठी उपस्थित आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील स्वागतासाठी उपस्थित आहेत.

  • 14 Jun 2022 01:15 PM (IST)

    अजित पवार मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल

    अजित पवार मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल

    मोदी लोहगाव विमानतळावर दाखल

    देहूतील मोदींच्या सभेला बंडातात्या कराडकरांची हजेरी

    मोंदीच्या देहूतील सभेला प्रचंड गर्दी

  • 14 Jun 2022 01:10 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोहगाव विमानतळावर आगमन 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोहगाव विमानतळावर आगमन 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोहगाव विमानतळावर आगमन

    विशेष वाहनानं ते सभेच्या ठिकाणी पोहोचतील

    साधारण अर्ध्यातासात देहू येथे पोहोचतील

    आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष

  • 14 Jun 2022 01:07 PM (IST)

    भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत

    वारकऱ्यांना येऊन संबोधित करणार आहेत

    वारकऱ्यांसोबत नागरिक उपस्थित आहेत

    त्याचबरोबर भाजपाचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत

    मोदीच्या स्वागतासाठी ४०० वारकरी करणार आहेत

    भाजपच्या अनेक नेत्यांची हजेरी आहे

    ध्वजपूजन होणार आहे

  • 14 Jun 2022 12:57 PM (IST)

    PM Modi यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचे लोकार्पण, देहूतील संत तुकाराम मंदिराबाहेरुनLive

  • 14 Jun 2022 12:51 PM (IST)

    मोदींच्या सभास्थळी पोहोचण्यासाठी वारकऱ्यांना पीएमपीएमएल बसची सोय

    मोदींच्या सभास्थळी पोहोचण्यासाठी वारकऱ्यांना पीएमपीएमएल बसची सोय

  • 14 Jun 2022 12:49 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असा असेल

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असा असेल

    1:40 वाजता आगमन

    चौदा टाळकरी प्रवेशद्वार जवळ वारकरी स्वागत

    विठ्ठल – रुक्मिणीचे मंदिरात जाऊन दर्शन

    वारकरी ध्वज पूजन

    राम मंदिर दर्शन

    हरेश्वर दर्शन

    पान दरवाजा मधून इंद्रायणी, भंडारा, भामचंद्र आणि घोरवडेश्वर तपस्थान दर्शन

    शिळा मंदिर आणि मूर्तीचे लोकार्पण

    कोणाशीला अनावरण

    भजनी मंडपात पालखी, गाथा दर्शन, अभिप्राय मग सन्मान

    2 : 00 – मुख्य मंदिरातून सभा मंडपाकडे मार्गस्त

    2:05 – सभा मंडपात आगमन

    3:30 – दौरा संपवून मुंबईकडे मार्गस्त

  • 14 Jun 2022 12:46 PM (IST)

    ध्या गणवेशात पोलीस तैनात, ट्रॅफिक पोलिसांकडून परिसरात गस्त सुरू

    – मुंबईच्या बीकेसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची तयारी सुरू… संध्याकाळी ६ वाजता मोदी बीकेसीत येणार…

    – जिओ सेंटर इथे बाॅम्ब शोधक पथक दाखल… पोलिसांतडून आसपासच्या रस्त्यावर बॅरिकेटींगला सुरवात…

    – जिओ वर्ल्डच्या आत जाणार्या प्रतियेक गाड्यांची तपासणी…

    – साध्या गणवेशात पोलीस तैनात, ट्रॅफिक पोलिसांकडून परिसरात गस्त सुरू…

  • 14 Jun 2022 12:45 PM (IST)

    पाच वर्षाच्या चिमुकल्यानं वेधलं लक्ष

    पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे वारकरी संप्रदयाला सबोधित करणार आहेत. राज्याच्या कनकोपऱ्यातुन अनेक वारकरी येवू लागले आहे त्यात एक आकर्षण म्हणजे पाच वर्षीय वेद मारने है आकर्षक अशी संत तुकाराम महाराजाची वेशभूषा केलीय. अनेकच्या नजरा ह्या वेद मारने वर पड़त आहेत. पाच वर्षीय वारकरी वेद मारने यांच्या सोबत बातचीत केली आहे.

  • 14 Jun 2022 12:43 PM (IST)

    महेश लांडगे, सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा साथी पंतप्रधान नरेन्द्र मोदी उपस्थित राहनार आहेत. त्यामुळे वारकरया प्रमाणे राजकीय नेत्यांच्या देखील काही अपेक्षा आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काशी,विश्वेश्वर च्या धर्ती वर देहू-आळंदीचा विकास झाला पाहिजे असल्याचा मत व्यक्त केलय.

  • 14 Jun 2022 12:40 PM (IST)

    पंतप्रधाना बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा; अमरावतीत भाजपचे पोलीस ठाण्यात घोषणा

    काँग्रेसचे नागपूरचे माजी अध्यक्ष शेख हुसैन यांनी काल ED कार्यालयासमोर आंदोलना दरम्यान भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केले. मोदी कुत्ते की मौत मरेगा.. असे तो म्हणाला. हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे आज अमरावतीत भाजप आक्रमक झाली आहे, बडनेरा पोलीस ठाण्यात भाजपने काँग्रेसचे शेख हौसैन बद्दल जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करत पोलीस ठाण्यात आंदोलन केलं,आमच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यामुळे जातीय तणाव देखील निर्माण होऊ शकतो. शेख हुसैन यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास मोदी समर्थक त्याला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. परिणामी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यास तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली यावेळी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली
  • 14 Jun 2022 12:33 PM (IST)

    पंतप्रधान थोड्याचवेळात दिल्लीतून देहूकडे रवाना होतील

    पंतप्रधान थोड्याचवेळात दिल्लीतून देहूकडे रवाना होतील

    आजच्या सभेत मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे

    मंदीरात जाऊन विठ्ठल रूक्मीनीचं ते दर्शन घेतील

  • 14 Jun 2022 12:27 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला गायिका कार्तिकी गायकवाड यांचीही उपस्थिती

    – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला गायिका कार्तिकी गायकवाड यांचीही उपस्थिती,

    – सभेपूर्वी कार्तिकी गायकवाडच्या कार्यक्रमाचे आयोजन,

    – वारकऱ्यांप्रमाणे मलाही आजच्या कार्यक्रमाचा उत्साह

  • 14 Jun 2022 12:27 PM (IST)

    सभास्थळी काळ्या कपड्यास मज्जाव

    NCP Ravikant Varpe issue Notice: पंतप्रधान मोदींची प्रतिमा भगवान विठ्ठलापेक्षा मोठी असल्याच्या दाव्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या रविकांत वरपेना पोलिसांची नोटीस ; सभास्थळी काळ्या कपड्यास मज्जाव

  • 14 Jun 2022 12:23 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला गायिका कार्तिकी गायकवाडही उपस्थित

  • 14 Jun 2022 12:17 PM (IST)

    देहूमध्ये दुपारी दोन वाजता मोदींची सभा सुरू होणार

    देहूमध्ये दुपारी दोन वाजता मोदींची सभा सुरू होणार

    आतापासूनच वारकरी येण्यास सुरुवात झाली आहे

    तिथं येणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे

    त्याचबरोबर त्यांना एसी बसची व्यवस्था करण्यात आली आहे

  • 14 Jun 2022 12:13 PM (IST)

    बीकेसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनाची तयारी, जिओ सेंटरमध्ये बॉम्ब स्कॉड दाखल

  • 14 Jun 2022 12:05 PM (IST)

    छोटा वारकरी वेद मारने देहूत सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू

    छोटा वारकरी वेद मारने देहूत सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू

  • 14 Jun 2022 11:59 AM (IST)

    मोदींच्या देहू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड

    – मोदींच्या देहू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड,

    – पिंपरी चिंचवडमधले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पिंपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात,

    – भापकर आज रेल्वे लाईनग्रस्तांच्या प्रश्नाप्रकरणी आंदोलन करणार होते,

    – पंतप्रधानांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं भापकर म्हणालेत

    – आंदोलनं रोखण्यासाठी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनाही घेतलं ताब्यात

  • 14 Jun 2022 11:53 AM (IST)

    देहूत सभास्थळापर्यंत जाण्यासाठी ई-बसची व्यवस्था

  • 14 Jun 2022 11:42 AM (IST)

    भाजपा खासदार प्रितम मुंडेंना तुकाराम महाराज देहू संस्थाननं मोदींच्या सोहळ्याचं पाठवलं होतं निमंत्रण

    प्रितम मुंडे देहू संस्थानला एक पत्र दिलंय,

    भाजपा खासदार प्रितम मुंडेंना तुकाराम महाराज देहू संस्थाननं मोदींच्या सोहळ्याचं पाठवलं होतं निमंत्रण

    मात्र प्रितम मुंडे नियोजित परदेश दौऱ्यावर

    परदेश दौऱ्यावर असल्यानं येऊ शकत नसल्याचं दिलं तुकाराम महाराज संस्थानला पत्र

    भारताबाहेर असल्यानं सोहळ्याला येता येणार नाही

    मात्र भविष्यात माझ्या हातून वारकरी सांप्रदायची सेवा घडत राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना दिलं पत्र

  • 14 Jun 2022 11:40 AM (IST)

    देहूतील मोदींच्या सभास्थळी शिवेंद्रराजे दाखल

  • 14 Jun 2022 11:33 AM (IST)

    सभास्थळापर्यंत जाण्यासाठी ई- बसची व्यवस्था

    सभास्थळापर्यंत जाण्यासाठी ई- बसची व्यवस्था

    देहूतील सभा स्थळापर्यंत जाण्यासाठी ई बसची व्यवस्था

    मोदींच्या सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास

    वारकऱ्यांना बसमार्फत सोडलं जाणार सभास्थळापर्यंत

  • 14 Jun 2022 11:31 AM (IST)

    मोदींबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

  • 14 Jun 2022 11:14 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर स्वागतच करेल – सुप्रिया सुळे

    मी मांदिरात कधीही मागायला येत नाही मी आभार मानायला येते..

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर स्वागतच करेल..

    भारतातही नवीन पिढीला नोकरी मिळत असेल तर मनापासून मी स्वागतच करेल…

  • 14 Jun 2022 11:13 AM (IST)

    देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत

    देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत

    शिळा आणि मंदिर लोकापर्ण सोहळा

    नरेंद्र मोदी तुकोबांची पगडी भेट म्हणून देण्यात येणार आहे

    त्यावर अभंग लिहिला आहे

    त्यात बदल करण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे

    त्याची सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे

  • 14 Jun 2022 11:04 AM (IST)

    मुंबईच्या बीकेसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची तयारी सुरू

    ब्रेक – मुंबईच्या बीकेसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची तयारी सुरू… संध्याकाळी ६ वाजता मोदी बीकेसीत येणार…

    – जिओ सेंटर इथे बाॅम्ब शोधक पथक दाखल… पोलिसांतडून आसपासच्या रस्त्यावर बॅरिकेटींगला सुरवात…

    – जिओ वर्ल्डच्या आत जाणार्या प्रतियेक गाड्यांची तपासणी…

    – साध्या गणवेशात पोलीस तैनात, ट्रॅफिक पोलिसांकडून परिसरात गस्त सुरू…

  • 14 Jun 2022 10:59 AM (IST)

    देहूतल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसणार, वाचा काय आहे कारण

    PM Narendra Modi | देहूतल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती!

    PM Narendra Modi | देहूतल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती!

  • 14 Jun 2022 10:52 AM (IST)

    मोदी दौऱ्याचं संपुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

    PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीक्षेत्र देहूत, मोदींनीही ट्विट करत दिली दौऱ्याची माहिती; वाचा संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक

    PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीक्षेत्र देहूत, मोदींनीही ट्विट करत दिली दौऱ्याची माहिती; वाचा संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक

  • 14 Jun 2022 10:47 AM (IST)

    पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त

    पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त

    देहू परिसरात रात्रीपासून पोलिस बंदोबस्त

  • 14 Jun 2022 10:45 AM (IST)

    मोदींच्या स्वागतासाठी देहू नगरी सजली

    मोदींच्या स्वागतासाठी देहू नगरी सजली

  • 14 Jun 2022 10:38 AM (IST)

    1 कोटी खर्चाचे मंदिर 6 वर्षात बांधले आहे

    1 कोटी खर्चाचे मंदिर 6 वर्षात बांधले आहे

    देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख नितीन मोरे यांनी सांगितले की, भक्तांच्या देणगीतून एक कोटी रुपये खर्चून हे ‘शिला’ मंदिर बांधण्यात आले आहे. “आम्ही राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत घेतलेली नाही. मंदिर बांधायला सहा वर्षे लागली.’ नितीन मोरे यांनी सांगितले की, मंदिरात एक खडक किंवा खडक असेल ज्याला वारकरी संप्रदाय वारी या वार्षिक यात्रेचा प्रारंभ बिंदू मानतो. वारीची सांगता पंढरपूरला होते.

  • 14 Jun 2022 10:37 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी काळा कपडा घेऊन जाण्यास मज्जाव

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी काळा कपडा घेऊन जाण्यास मज्जाव,

    – सभास्थळी गेटवर काळा कपडा, मास्क काढण्यास पोलिसांकडून सांगितलं जातंय,

    – सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी

  • 14 Jun 2022 10:33 AM (IST)

    मोदींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार

    मोदींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार

    लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येणार आहे

    मोदींना भेटायला आलाय चिमुकला

    मोदींचं भाषण ऐकण्यासाठी आला आहे

    त्यांने मोदींचं कौतुक केलंय

    मोदींना भेटणाऱ्या वारकर्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे

    टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे

  • 14 Jun 2022 10:24 AM (IST)

    मोदींचा आजचा पुणे दौरा स्पेशल

    मोदींचा आजचा पुणे दौरा स्पेशल

    दुपारी पुणयात दाखल होणार

    देहूत पोलिसांचा कडक बंदोबस्त

  • 14 Jun 2022 10:18 AM (IST)

    जे किशन रेड्डींचं ट्विट

  • 14 Jun 2022 10:08 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त

    पंतप्रधान नरेंद्र मोदी दूपारी देहूत येणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिपँड ते शिळा मंदीरापर्यंत जाणार बाय कार

    मोदींच्या कँन्व्हॉय जाणाऱ्या मार्गावर बीडीडीएस पथकाकडून तपासणी

    पोलिसांकडून चोख बंदोबस्त

    पुणे ग्रामीण पोलीसांच्या बीडीडीएस पथकाकडून तपासणी !

  • 14 Jun 2022 09:53 AM (IST)

    मा.प्रधानमंत्री यांच्या हस्ते नवीन जल भूषण इमारत व क्रांतिगाथा दालनाचे उद्घाटन

    मा. मुख्यमंत्री महोदय यांचे मंगळवार दि. १४ जून २०२२ रोजीचे कार्यक्रम

    दुपारी ४.०० वा. : – मा.प्रधानमंत्री यांच्या स्वागतासाठी उपस्थिती स्थळ : आयएनएस शिक्रा, मुंबई

    दुपारी ४.१५ वा. : – मा.प्रधानमंत्री यांच्या हस्ते नवीन जल भूषण इमारत व क्रांतिगाथा दालनाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : राजभवन मुंबई

    सायंकाळी ६.०० वा. : – मा.प्रधानमंत्री यांच्या हस्ते दै. मुंबई समाचार द्विशताब्दी महोत्सवानिमित्त स्मृती स्टॅम्प अनावरण समारंभास उपस्थिती स्थळ : जिओ वर्ल्ड सेंटर वांद्रे पू . मुंबई

  • 14 Jun 2022 09:50 AM (IST)

    मोदींचा आज महाराष्ट्र दौरा

  • 14 Jun 2022 09:48 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांचं ट्

  • 14 Jun 2022 09:27 AM (IST)

    आजच्या कार्यक्रमाला देहूतील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या अनुउपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नसणार,

    – मुख्यमंत्र्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंचावर मोदींसोबत उपस्थित रहाणार,

    – नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार काही दिवसांपासून सुरू होत्या चर्चा,

    – मात्र मुख्यमंत्र्यांनी दिला चर्चेला पूर्णविराम,

    – आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या अनुउपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा.

  • 14 Jun 2022 08:58 AM (IST)

    नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदीराचे लोकार्पण

  • 14 Jun 2022 08:49 AM (IST)

    भाजपच्या होर्डिंगमध्ये पंतप्रधान मोदींची प्रतिमा विठ्ठलापेक्षा मोठी असल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा दावा

  • 14 Jun 2022 08:46 AM (IST)

    मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात पंतप्रधान सहभागी होणार

    मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. मुंबई समाचार साप्ताहिक म्हणून छापण्याची सुरुवात 1 जुलै 1822 रोजी फरदुंजी मर्झबंजी यांनी केली. पुढे 1832 मध्ये ते दैनिक बनले. 200 वर्षांपासून हे वृत्तपत्र सतत प्रकाशित होत आहे. या अनोख्या पराक्रमाच्या स्मरणार्थ टपाल तिकीटही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  • 14 Jun 2022 08:45 AM (IST)

    महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री विद्यासागर राव यांना राजभवनात बंकर सापडला होता.

    2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री विद्यासागर राव यांना राजभवनात बंकर सापडला होता. याआधी ब्रिटीशांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासाठी गुप्त साठवण म्हणून त्याचा वापर केला होता. बंकरचे 2019 मध्ये नूतनीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी बंकरमध्ये एक प्रकारचे संग्रहालय म्हणून गॅलरी विकसित करण्यात आली आहे. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही बी गोगटे, 1946 मधील नौदल विद्रोह आणि इतरांच्या योगदानाला ते आदरांजली अर्पण करते.

  • 14 Jun 2022 08:34 AM (IST)

    तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान करणार

    देहू, पुणे येथील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. संत तुकाराम हे एक वारकरी संत आणि कवी होते. जे कीर्तन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आध्यात्मिक गीतांद्वारे अभंग भक्ती काव्य आणि समाजाभिमुख उपासनेसाठी प्रसिद्ध होते. ते देहू येथे राहत होते. त्यांच्या निधनानंतर शिला मंदिर बांधले गेले. 36 शिखरांसह ते दगडी दगडी बांधकामात पुन्हा बांधले गेले आहे आणि त्यात संत तुकारामांची मूर्ती देखील आहे.

  • 14 Jun 2022 08:32 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1:45 च्या सुमारास पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी 4:15 वाजता पंतप्रधान मुंबईतील राजभवन येथे जलभूषण बिल्डिंग आणि क्रांतिकारकांच्या गॅलरीचे उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत.

  • 14 Jun 2022 08:06 AM (IST)

    मुंबईमध्ये अनिल बोंडें करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत

    भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ अनिल बोंडें पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला….

    मुंबईमध्ये अनिल बोंडें करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर…

    खासदार अनिल बोंडें अमरावती वरून मुंबई साठी रवाना….

  • 14 Jun 2022 07:54 AM (IST)

    मंदिराच्या लोकार्पणानंतर मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार

  • 14 Jun 2022 07:30 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूर शहरातील माजी शहर काँग्रेस अध्यक्ष शेख हुशेन यांच्या विरोधात भाजप करणार तक्रार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूर शहरातील माजी शहर काँग्रेस अध्यक्ष शेख हुशेन यांच्या विरोधात भाजप करणार तक्रार

    गिट्टीखदान पोलीस स्टेशन मध्ये करणार तक्रार

    काल काँग्रेस ने इडी कार्यलयावर मोर्चा काढला होता

    त्या वेळी केलं होतं बेताल वक्तव्य

    त्या विरोधात भाजप तक्रार करणार

  • 14 Jun 2022 07:19 AM (IST)

    शिळा मंदीराचे लोकार्पण होणार त्यानिमित्त चालु असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे

    पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदीराचे लोकार्पण होणार त्यानिमित्त चालु असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे

  • 14 Jun 2022 07:19 AM (IST)

    संध्याकाळी मुंबईतील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांपैकी एक असलेल्या मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात भाग घेणार आहेत

  • 14 Jun 2022 07:17 AM (IST)

    मुंबईत पहिला कार्यक्रम राजभवनात होणार आहे.

  • 14 Jun 2022 07:15 AM (IST)

    आज महाराष्ट्र दौऱ्यावर

  • 14 Jun 2022 07:03 AM (IST)

    नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत

    नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. त्याचबरोबर अनेक उद्धघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

Published On - Jun 14,2022 7:01 AM

Follow us
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.