पीएम मोदी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी गणपती दर्शनाला गेलेले, त्यावर संजय राऊत म्हणतात…
"राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं ते भाजपाने मोडून-तोडून जनतेसमोर आणलं. आरक्षण रद्द करा असं राहुल गांधी म्हणालेले नाहीत" अशा शब्दात संजय राऊत यांनी राहुल गांधींचा बचाव केला.
धारावी पूनर्विकास प्रकल्पाच भूमिपूजन सरकारने गुपचूप उरकलं. त्या बद्दलही पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारलं. “अशा गुपचूप उरकण्याला अर्थ नसतो. धारावीतील जनतेचा, मुंबईतील जनतेचा या अदानी पूनर्वसन प्रकल्पाला विरोध आहे. हा धारावी पूनर्वसन प्रकल्प नाहीय. नरेंद्र मोदींचे लाडके मित्र गौतम अदानी पूनर्वसन प्रकल्प आहे. संपूर्ण देशच त्यांना दिलेला आहे. जिथे जमीन मोकळी दिसली की, अदानीचा बोर्ड लागतो. धारावी जमिनीचा तुकडा नाही. मुंबईसाठी महत्त्वाचा भूखंड आहे. लाखो लोकांच्या रोजागाराचा प्रश्न आहे. धारावीच्या निमित्ताने मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे. मुंबईतील मिठागरं, मुंबईतील मोक्याच्या जमिनी, मदर डेअरी सारखी जागा धारावी पूनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली अदानीला दिली जात असेल, तर मुंबई अदानीच्या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.
राहुल गांधींच्या आरक्षणा संदर्भातील वक्तव्यावर सुद्धा ते बोलले. “राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं ते भाजपाने मोडून-तोडून जनतेसमोर आणलं. आरक्षण रद्द करा असं राहुल गांधी म्हणालेले नाहीत. असं माझ्या ऐकण्यात-वाचनात नाही. भाजपावाले त्यांना हवं तेवढं घेतात” अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींचा बचाव केला.
मोदी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी गेले त्यावर काय प्रतिक्रिया?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती पूजनासाठी गेले होते. त्यावरुन विरोधक टीका करत आहेत. संजय राऊतही या विषयावर बोलले आहेत. “सरन्यायाधीश चंद्रचूड त्या खुर्चीवर आहेत, तो पर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही. चंद्रचूड घटनेचे रखवालदार आहेत. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार अमित शाह-नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेन आलं आहे. मोदी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गेले होते, त्यातून स्पष्ट संदेश मिळतो. या घटनाबाह्य गोष्टींना न्यायालयीन संरक्षण आहे. ही देशासाठी धोक्याची घंटा आहे” असं संजय राऊत म्हणाले.