दिग्विजय सिहांच्या प्रचार रॅलीत पोलिसांच्या गळ्यात भगवं उपरणं

भोपाळ (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भोपाळ मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रोड शोमध्ये मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कम्प्युटर बाबाही सहभागी झाले होते. या रोड शोच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस सिव्हिल ड्रेसववर होते. मात्र, धक्कादायक म्हणजे, या पोलिसांच्या गळ्यात भगवं उपरणं होतं. यातील एका […]

दिग्विजय सिहांच्या प्रचार रॅलीत पोलिसांच्या गळ्यात भगवं उपरणं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

भोपाळ (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भोपाळ मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रोड शोमध्ये मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कम्प्युटर बाबाही सहभागी झाले होते. या रोड शोच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस सिव्हिल ड्रेसववर होते. मात्र, धक्कादायक म्हणजे, या पोलिसांच्या गळ्यात भगवं उपरणं होतं.

यातील एका महिला पोलिसाने एनएनआय या वृत्तसंस्थेशी भगव्या उपरण्याबाबत बोलताना सांगितले, “आमच्याकडून असे करुवून घेतले जात आहे.” यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण तापलं आहे. आधीच पोलिस सिव्हिल ड्रेसवर, त्यात गळ्यात भगवं उपरणं, यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

भोपाळ लोकसभा मतदारंसघात 12 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. भोपाळमधून काँग्रेसकडून वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह, तर भाजपकडून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर रिंगणात आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या हिंदुत्त्ववादी चेहरा मानल्या जातात. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी दिग्विजय सिंहही मागे राहिले नाहीत. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कॉम्प्युटर बाबांसह अनेक साधूबाबांना घेऊन दिग्विजय सिंह यांनी प्रचाराचा रोड शो केला. यावेळी दिग्विजय यांनी पत्नीसह होमहवनही केलं.

दुसरीकडे, काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात प्रचारासाठी आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेही भोपाळमध्ये येणार आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते असेलेल्या दिग्विजय सिंह विरुद्ध मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यातील लढाई अत्यंत चुरशीची झाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.