“पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?”
पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?, असं म्हणत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यसंदर्भात मोठं भाष्य केलंय. (Political Analyst Ashok Wankhede Statement On Sharad pawar pm modi Meet)
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा केवळ प्रशासकीय आहे असं वाटत नाही. पियुष गोयल पवारांना भेटले होते. त्यानंतर राजनाथ सिंह भेटले. त्यानंतर आता मोदी-पवार भेट म्हणजे याला राजकीय अंग आहे. पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?, असं म्हणत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यसंदर्भात मोठं भाष्य केलंय.
मोदी-पवार भेटीवर काय म्हणाले अशोक वानखेडे?
शरद पवार पहिल्यांदा पियुष गोयल यांना भेटले आणि त्यानंतर राजनाथ सिंह यांना भेटले. आता त्यानंतर शरद पवार-मोदी भेट होतीय. या भेटीला निश्चित राजकीय अंग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील 48 जागा आहेत लोकसभेचा. त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते, असं मत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको
महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. २०२२ मध्ये पाच राज्यांच्या निकालाची वाट पाहण्याची गोष्ट करतात. महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. नाना पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहित आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं.
पवारांच्या मास्टर प्लॅनला आतापासूनच खिंडार पाडण्याच्या हालचाली?
“सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. भाजपकडून आनंदीबेन पटेल यांचं नाव पुढे केलं जात आहे. त्या मोदींच्या जवळच्या आहेत. 2024 च्या निवडणुकीसाठी शरद पवार देशातील राजकीय नेत्यांची मोट बांधू शकतात. त्यामुळे त्याला आतापासूनच खिंडार पाडण्याच्या हालचाली असू शकतात.”
“शरद पवार तिथे शंका ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मागच्या अधिवेशनावेळी शरद पवार मोदी 40 मिनिटे झाली. त्यावेळी त्यांनी सांगितलं पाऊस पाण्याबद्दल बोललो. मग लगेचच मोदी-शाह भेट झाली. मग त्यानंतर 80 तासांचं सरकार महाराष्ट्रात बनलं. त्यामुळे शरद पवार तिथे शंका आहेच. म्हणून पवार-मोदी भेट ही प्रशासकीय भेट नक्कीच नाही, ती राजकीय आहे. काँग्रेस सोडून सरकार बनवलं जाऊ शकतं का अशी चर्चा असू शकते”
(Political Analyst Ashok Wankhede Statement On Sharad pawar pm modi Meet)
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यात तासभर खलबतंhttps://t.co/9ssadfTu97#SharadPawar | #PMNarendraModi | #ncp | #bjp | #MonsoonSession
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2021
हे ही वाचा :
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं