‘नाव उदय, पण यांनी शिक्षणाचा अस्त केला’, या सुधीर मुनगंटीवारांच्या टीकेला सामतांचंही प्रत्युत्तर
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर सुधीर मुलगंटीवार यांनी घणाघाती शब्दांत टीका केली आहे. नाव उदय, पण शैक्षणिक विभागात अस्त करण्याचं पाप यांनी केलंय, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावलंय.
मुंबई : विद्यापीठ दुरुस्ती विधेयकावरुन विधानसभेच्या अखेरच्या सत्रात जोरदार खडाजंगी झाली, विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. पण सत्ताधाऱ्यांच्या पुढे विरोधकांचं काहीच चाललं नाही. अखेर विद्यापीठ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. यावरुन प्रचंड नाराज झालेल्या विरोधकांनी सभागृहातून बाहेर आल्यानंतर सरकारवर तीव्र शब्दांत टीका करताना जोरदार हल्लाबोल केला.
‘नाव उदय, पण हा तस अस्त करायला निघाला’
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर सुधीर मुलगंटीवार यांनी घणाघाती शब्दांत टीका केली आहे. नाव उदय, पण शैक्षणिक विभागात अस्त करण्याचं पाप यांनी केलंय, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावलंय. विद्यापीठ दुरुस्ती विधेयकावरुन त्यांनी सरकारविरोधीत तीव्र शब्दांत टीका करताना म्हटलंय की…
हा तर सरकारचा आतंकवाद आहे. विधेयकावर देवेंद्र फडणवीस उत्तर सूचना मांडत असताना, सभागृहाच्या प्रथा आणि परंपरांचं उल्लंघन करत हा कायगदा करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारनं केलं आहे. या सरकारला अभ्यास न करणाऱ्या मुलांना मेरीटमध्ये आलेल्या मुलांची मार्कशीट द्यायची आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या या राज्यात शिक्षण क्षेत्रात अव्यवस्था करण्याता पाप सरकारकडून होतंय. आम्ही आता या सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. आम्ही तरुणांना आवाहन करतो की त्यांनी सरकारच्या विरोधात आम्ही जे आंदोलन करणार आहोत, त्यात सामील व्हाव. ऊठ तरुणा जागा हो, सरकारविरोधीत संघर्षाचा धागा हो!
दरम्यान, मुनगंटीवार यांनी सरकारविरोधात आंदोलन करण्याच्या इशाऱ्यासोबत आज सभागृहात जे झालं ते शतकातलंच नव्हे तर सहस्त्रकातलं सगळ्यात मोठं पाप महाविकास आघाडीनं केल्याची टीका मुनगंटीवारांनी केली आहे. लोकशाहीचं वस्त्रहरण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
सामंत यांचं प्रत्युत्तर
दरम्यान, विरोधकांनी जी टीका केला, जे म्हणणं मांडले, ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. प्र-कुलपतीवरुन गैरसमज निर्माण केले जात असल्याचं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. प्र-कुलपतीबाबत संभ्रम निर्माण केला जात असून कुलपतींचे अधिकार काढून घेतले जाणार आहे, हे विरोधकांचं म्हणणं साफ चुकीचं आहे, असंही सामंत यांनी म्हटलंय. कोणाचेही अधिकार आम्ही काढून घेतलेले नाही, असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. विरोधकांनी संभ्रम निर्माण करुन या विधेयकाबाबत गैरसमज पसरवण्याचं काम केलं असल्याची टीका उदय सामंत यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ –
इतर बातम्या –
एका आमदारासाठी इतका फौजफाटा का? पोलिसांच्या कारवाईविरोधात नारायण राणे आक्रमक
नव्या वर्षात नवे कर: ओला-उबर राईडवर जीएसटी, बूट महागणार!
‘लोकशाहीतला सर्वात काळा दिवस’ फडणवीसांचा हल्लाबोल, सरकारला पळपुटं का म्हणाले फडणवीस?