Eknath Shinde : शिवसेनेच्या राशीला ‘एकनाथ’; एका एकनाथांनी युती तोडली, दुसऱ्याने शिवसेनाच फोडली; वाच नेमकं प्रकरण काय?

Eknath Shinde : 2014मध्ये शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपावरून बिनसलं होतं. या निवडणुकीत शिवसेनेला ज्यादा जागा हव्या होत्या. तर भाजपला लोकसभेतील मतांच्या आकडेवारीवरून जागा हव्या होत्या.

Eknath Shinde : शिवसेनेच्या राशीला 'एकनाथ'; एका एकनाथांनी युती तोडली, दुसऱ्याने शिवसेनाच फोडली; वाच नेमकं प्रकरण काय?
शिवसेनेच्या राशीला 'एकनाथ'; एका एकनाथांनी युती तोडली, दुसऱ्याने शिवसेनाच फोडलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 9:00 PM

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे हे तब्बल 35 आमदारांना घेऊन सुरतला आले आहेत. आज संध्याकाळी त्यांनी अहमदाबाद येथे भाजप नेते अमित शहा (amit shah) आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (devendra fadnavis) अहमदाबादला जाणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेनेची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. शिंदे यांच्यामुळे ठाकरे घराण्यातील पहिल्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्रीपदाचा डाव अर्ध्यावरच सोडावा लागणार असल्याचं चित्रं आहे. या आधी शिवसेनेला राष्ट्रवादीचे विद्यमान नेते एकनाथ खडसे यांच्यामुळे डोकेदुखी झाली होती. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांनी शिवसेना-भाजपची युती तुटल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे खडसे हे शिवसेनेच्या रडारवर आले होते. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दे धक्का दिल्याने शिवसेनेची चांगलीच पंचाईत झाली आहे.

त्यावेळी काय झालं होतं?

2014मध्ये शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपावरून बिनसलं होतं. या निवडणुकीत शिवसेनेला ज्यादा जागा हव्या होत्या. तर भाजपला लोकसभेतील मतांच्या आकडेवारीवरून जागा हव्या होत्या. पण शिवसेना त्या द्यायला तयार नव्हती. त्यामुळे युतीचा जागा वाटपाचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर युती तुटल्याची घोषणा करण्याची जबाबदारी तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याकडे सोपवली गेली. त्याचवेळी मोदींचा परदेश दौरा होता. मोदींच्या विमानाने उड्डाण घेताच इकडे नाथाभाऊंनी पत्रकार परिषद घेऊन युती तुटल्याची घोषणा केली. त्यानंतर खडसे हे शिवसेनेच्या रडारवर आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा करायची असेल तर देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जायचे. खडसे यांना पाठवले जात नसायचे.

हे सुद्धा वाचा

पुन्हा एकनाथ

आता पुन्हा एकदा आणखी एक एकनाथ शिवसेनेच्या राशीला आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे हे काही आमदारांसोबत गुजरातच्या सुरतमध्ये आहेत. त्यांच्यासोबत एकूण 35 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी बंड केल्याचं कळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांच्याशी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांनी भेटून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधला. त्यानंतर आज संध्याकाळी शिंदे यांची भाजप नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यानंतर शिंदे मीडियासमोर येऊन त्यांचं म्हणणं मीडियासमोर मांडतील असं सांगितलं जात आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.