स्पेशल रिपोर्ट : कीर्तिकरांवरुन भाजप-सेनेत वादाची ठिणगी?

गजानन कीर्तिकरांवरुन भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडलीय का? असाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय. गजानन कीर्तिकरांनी अमोल कीर्तिकरांचं कौतुक करत आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला होता. दरम्यान त्यानंतर भाजप नेत्यांनी कीर्तिकरांवर टीका केली होती. मात्र, भाजप नेत्यांच्या टीकेला अडसूळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.

स्पेशल रिपोर्ट : कीर्तिकरांवरुन भाजप-सेनेत वादाची ठिणगी?
शिवसेना नेते गजानन कीर्तिकर
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 11:00 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकरांनी अमोल कीर्तिकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी थेट गजानन कीर्तिकरांवर टीकास्त्र डागलंय. भाजप नेते आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांनी काही प्रश्न उपस्थित करत गजानन कीर्तिकरांवर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजप नेत्यांची खरडपट्टी काढत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “अमोलला बिनविरोध करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता”, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. तर “चुकीचं सहन करत नाही, बोलायला लागलो तर सोडत नाही”, असं प्रत्युत्तर आनंदराव अडसूळ यांनी दिलं. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. अडसूळांनी नको त्या विषयाला हात घालायला नको”, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना गजानन कीर्तिकरांनी प्रचाराच्या मैदानात उतरत लेकाविरोधात दंड थोपटलं होतं. मात्र, कीर्तिकरांनी राज्यातील शेवटच्या टप्प्यानंतर अमोल कीर्तिकरांचे गोडवे गात आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला होता. अमोल कीर्तिकरांना शिंदेंनी ऑफर दिली होती. पण तो निष्ठावंत आहे, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.

शिशिर शिंदेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान गजानन कीर्तिकरांच्या या वक्तव्यानंतरच शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित कीर्तिकरांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्य करुन ठाकरे गटाची बाजू घेतली. मतदाना दिवशी गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. गजानन कीर्तिकरांचा खासदार निधी अमोल यांनी प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला. अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते, यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला. गजानन कीर्तिकरांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. गजानन कीर्तिकरांना ‘मातोश्री’वर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे. ‘मातोश्री’चे ‘लाचार श्री’ होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवा. गजानन कीर्तिकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्या, असं शिशिर शिंदे पत्रात म्हणाले.

गजानन कीर्तिकर काय म्हणाले?

गजानन कीर्तिकरांनी केलेलं वक्तव्य चीड आणणारं आहे, असंदेखील शिशिर शिंदे म्हणाले आहेत. त्यावर पक्षांतर्गत विषय चव्हाट्यावर मांडायचा नसतो, असं गजानन कीर्तिकर म्हणाले आहे. दरम्यान, कीर्तिकरांवर कारवाई होऊ देणार नाही, कोण शिशिर शिंदे? असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. गजानन कीर्तिकरांनी दिलगिरी व्यक्त केली असून पक्ष त्यांच्याबाबतचा निर्णय घेईल असं स्पष्टीकरण शिंदेंकडून देण्यात आलं होतं. गजानन कीर्तिकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय. त्यामुळे गजानन कीर्तिकरांबाबत पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारय.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.