सचिन वाझेंच्या अटकेनंतर सत्ताधारी-विरोधक आक्रमक; वाचा, कोण काय काय म्हणाले?

तब्बल 13 तासांच्या अटकेनंतर अखेर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. (political leaders reaction on Sachin Vaze arrest issue)

सचिन वाझेंच्या अटकेनंतर सत्ताधारी-विरोधक आक्रमक; वाचा, कोण काय काय म्हणाले?
25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते.
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 1:05 PM

मुंबई: तब्बल 13 तासांच्या अटकेनंतर अखेर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक झाल्यानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले असून सत्ताधारी बॅकफूटवर गेले आहेत. या प्रकरणानंतर विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितला असून सत्ताधाऱ्यांनी एनआयएला सदसदविवेकबुद्धीने कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. (political leaders reaction on Sachin Vaze arrest issue)

पोलीस आयुक्तांना हटवा: भातखळकर

सचिन वाझे यांच्यावर महाराष्ट्र विकास आघाडीची इतकी मेहरबानी का? आणि वाझे यांचे कोणत्या आमदार-खासदार आणि राजकीय पक्षांची नाते आहे हे तपासणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. वाझे यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्यांना क्राईम ब्रँच सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कसे काय घेण्यात आले, याचा सुद्धा तपास होणे गरजेचे आहे. याप्रकरणी चालढकल केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करते जी गाडी वापरण्यात आली तीच गाडी अंबानीच्या घराखाली होती. तसेच या गाडीवरची नंबर प्लेटही खोटी असून त्याचाही तपास करण्यात आला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

वाझेंना खलनायक ठरवलं जातंय: पटोले

खोटे आरोप करायचे हे विरोधकांचे काम आहे. त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा उद्योग सुरू आहे. सचिन वाझेंना खलनायक बनविण्याचे काम विरोधक करत आहेत, असं सांगतानाच तपास यंत्रणानी नार्को टेस्ट करायची असेल तर करू द्यावी, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

देशमुखांची हकालपट्टी करा: सोमय्या

मला आशा आहे की सचिन वाझे गँगच्या आणखी सदस्यांची अटक होईल, असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी 3 दिवस वाझे यांच्याशी काय चर्चा केली? ठाकरे सरकारने पोलिसांना वाझेंच्या संरक्षणासाठी, वाचविण्यासाठी वापरले. त्यामुळे अनिल देशमुख यांची गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

यात नक्कीच काळंबेरं: विनायक राऊत

वाझे प्रकरणात सत्य काय असेल ते समोर येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधावर अन्याय होता नये, असं सांगतानाच 17 वर्षांपूर्वी वाझेंचा ज्या पद्धतीने बळी दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होतेय असं वाझेंचं मत आहे. त्यामुळे यात नक्कीच काही तरी काळंबेरं असण्याची शक्यता आहे, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. एनआयएने सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून या प्रकरणी कारवाई करावी. अन्वय नाईक प्रकरण त्यावेळी कसं दाबलं गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे आपल्या जवळचा असेल त्याला संरक्षण द्यायचं आणि दुसऱ्यावर सत्तेचा दुरूपयोग करायचा ही नीती सध्या विरोधकांची चालली असल्याची टीका राऊत यांनी फडणवीस यांचं नाव न घेता केली.

हा स्थानिक प्रश्न: पवार

सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटाकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे मोघम वक्तव्य शरद पवार यांनी केले. (political leaders reaction on Sachin Vaze arrest issue)

वाझेंची नार्को टेस्ट करा: राम कदम

जिलेटीन स्फोटकांच्या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपचे नेते राम कदम यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 288 आमदारांना विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायची होती. भाजपने केवळ सचिन वाझे यांना अटक करावी, इतकीच मागणी केली होती. मात्र, महाविकासआघाडी सरकारने ही मागणी मान्य केली नाही. सचिन वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की त्यामुळे सरकार आणि नेते अडचणीत येऊ शकतात?, असा सवालही त्यांनी केला. (political leaders reaction on Sachin Vaze arrest issue)

संबंधित बातम्या:

‘या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल,’ कंगनाचं मोठं वक्तव्य

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

(political leaders reaction on Sachin Vaze arrest issue)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.