Sandeep Deshpande : ‘हिरवे कंदिल लागले असते, तर तुम्ही…’, मनसेचा उद्धव ठाकरे गटाला थेट सवाल

Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात आयोजित केलेल्या दिपोत्सवावरुन राजकारण तापू लागलं आहे. दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. आता मनसेच्यावतीन संदीप देशपांडे यांनी रोखठोक उत्तर दिलय.

Sandeep Deshpande : 'हिरवे कंदिल लागले असते, तर तुम्ही...', मनसेचा उद्धव ठाकरे गटाला थेट सवाल
MNS deepotsav 2024
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 11:31 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाच आयोजन केलं आहे. शिवाजी पार्कमध्ये दिपावलीच्या निमित्ताने भव्य रोषणाई करण्यात आली आहे. हा दिपोत्सव पहायला येणार नागरिक इथला नजारा पाहून हरखून जात आहेत. अत्यंत नेत्रदीपक, भव्य अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीला मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाच आयोजन केलं जातं. आता विधानसभा निवडणुका असल्याने उद्धव ठाकरे गटाने या दिपोत्सवावर आक्षेप घेतला आहे. मनसेच्या दिपोत्सवाविरोधात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली आहे. दिपोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेकडून नियमबाह्य परवानगी घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. मनसेकडून अचारसंहितेच उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार अनिल देसाई यांनी केली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे गटाच्या या आक्षेपाला उत्तर दिलं आहे.

‘उबाठाने या सिंपल प्रश्नाच उत्तर द्यावं’

“उद्धव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे. हिरवे कंदिल लागले असते, तर विरोध केला असता का?” असा सवला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. ते वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवत आहेत. “मूळात उबाठाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदच लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर उबाठाने विरोध केला असता का? हा माझा सिंपल प्रश्न आहे” असं ते म्हणाले. उबाठाची भूमिका हिंदू सण विरोधी

“भेडींबाजारमध्ये जाऊन ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? ईदमध्ये डीजे लावतात त्यांना विरोध करता का? मग हिंदू सणांना विरोध का? उबाठाची भूमिका हिंदू सण विरोधी आहे” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.