झारखंडमध्ये सत्तासंघर्ष टीपेला, 15 गाड्या घेऊन निघाले मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांचे आमदार, चोख बंदोबस्त
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरुन तीन लक्झरी बसमधून ( 3 luxury buses)या आमदारांना शिफ्ट करण्यात येते आहे. या बसमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे 36आमदार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेही या आमदारांसोबत आहेत. या आमदारांसोबतचा एक सेल्फीही त्यांनी शेअर केला आहे.
रांची – झारखंडच्या (Jharkhand)राजकारणातील आजचा मोठा दिवस आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren)यांच्या आमदारकी अपात्र ठरवल्याचा आदेश शनिवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. सोरेन यांची आमदारकीच अडचणीत आल्यामुळे राज्याचे सरकारही धोक्यात आल्याचे मानण्यात येते आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडीच्या आमदारांची बैठक सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. ही कालपासूनची तिसरी बैठक होती. महत्त्वाची बाब म्हणजे बैठकीसाठी आलेले मंत्री, आमदार त्यांच्या गाड्यांमध्ये मोठमोठ्या सुटकेस घेऊन आले होते. आता या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना राज्याच्या बाहेर छत्तीसगडमध्ये नेण्यात येत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरुन तीन लक्झरी बसमधून ( 3 luxury buses)या आमदारांना शिफ्ट करण्यात येते आहे. या बसमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे 36आमदार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेही या आमदारांसोबत आहेत. या आमदारांसोबतचा एक सेल्फीही त्यांनी शेअर केला आहे.
Two buses, carrying Jharkhand MLAs, left from CM Hemant Soren’s residence earlier this afternoon after a meeting of the UPA legislators.
हे सुद्धा वाचाPics from inside the buses. pic.twitter.com/nGodgPV7FY
— ANI (@ANI) August 27, 2022
कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत आमदारांचा दौरा
पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत या तिन्ही बसना खुंटीच्या लतरातू डॅमच्या परिसरात नेण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते आहे. तिथे असलेल्या डुमरगढी रेस्ट हाऊसमध्ये हे आमदार पुढचे काही दिवस मुक्काम करण्याची शक्यता आहे. त्या गेस्ट हाऊसच्या बाहेरही कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. गेस्टहाऊसमध्ये खुर्च्या आणि गाद्या मागवण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकारीही पोहचलेले असल्याची माहिती आहे. काही दिवस या ठिकाणी ठेवल्यानंतर या णदारांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येईल, असेही सांगण्यात येते आहे.
गेस्टहाऊसमध्ये मटण, फिश करी आणि भात तयार
लतरातू डॅमच्या गेस्टहाऊसमध्ये या आमदारांच्या खाण्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आमदारांच्या जेवणासाठी मटण, फिश करी आणि भात तयार करण्यात येतो आहे. शाकाहारी असणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था आहे.