Narayan Rane | मागे सूर्य, समुद्र आणि हार्टशेपमध्ये नारायण राणे सपत्नीक! पवनचक्की गार्डनमधून पॉवरफूल फ्रेम

नारायण राणे यांनी पवनचक्की गार्डनचा यावेळी परिवारासह फेरफटका मारला. काही काळ त्यांनी या गार्डनमध्ये घालवत निवांत क्षण अनुभवले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्थानिक आमदार असलेल्या आपल्या मुलाचं अर्थात नितेश राणेंचं कौतुकही केलंय.

Narayan Rane | मागे सूर्य, समुद्र आणि हार्टशेपमध्ये नारायण राणे सपत्नीक! पवनचक्की गार्डनमधून पॉवरफूल फ्रेम
नारायण राणे
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 4:06 PM

सिंधुदुर्ग : सिंधदुर्गात (Sindhudurg) नगरपंचायत निवडणुकींच्या रणधुमाळीला वेग आलाय. राजकीय नेत्यांची पळापळ सुरुच आहे. निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नारायण राणेही (Narayan Rane) आपल्या बालेकिल्ल्यात नगरपंचायतीसाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेत. राजकीय वारे जोरदार वाहू लागलेले असतानाच नारायण राणेंनी देवगडमध्ये (Deogad) केलेलं फोटोसेशन सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतंय. मागे सूर्य, समुद्र, सोसट्याचा वारा आणि हार्टशेपमध्ये नारायण राणे सपत्नीक असलेली फोटो फ्रेम सगळ्यांचंच लक्ष वधून घेतेय.

हार्टशेपमधला हार्टटचिंग क्लिक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पवनचक्कीचा स्पॉट हा पर्यटनासाठी (Tourism) प्रसिद्ध आहे. आमदार नितेश नाणेंनी याठिकाणी पवनचक्की गार्ड उभारलंय. या गार्डनला नारायण राणेंनी सप्तनीक भेट दिली. या गार्डनमध्ये फेरफटका मारला. इतकंच काय, तर सपत्नीक फोटो काढण्याचाही मोहदेखील यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आवरला नाही. हार्टशेप ब्रॅकग्राऊंडवर समुद्राला टिपत उभयतांनी काढलेल्या फोटोची चर्चा संपूर्ण तालुक्यात ऐकायला मिळतेय.

गार्डन पाहून काय म्हणाले राणे?

नारायण राणे यांनी पवनचक्की गार्डनचा यावेळी परिवारासह फेरफटका मारला. काही काळ त्यांनी या गार्डनमध्ये घालवत निवांत क्षण अनुभवले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्थानिक आमदार असलेल्या आपल्या मुलाचं अर्थात नितेश राणेंचं कौतुकही केलंय. पवनचक्की गार्डन बघून फार आनंद झाल्याची प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे. तसंच याआधी होऊन गेलेल्या आमदारांना पवनचक्की गार्डन करण्याइतकी विकासाची दूरदृष्टी नव्हती, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

नगरपंचायतींची तयारी!

सध्या राणेंकडून सिंधुदुर्गात नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे गाठीभेटी घेण्याचा सिलसिला सुरु आहे. वैभववाडीपासून, देवगड, कुडाळमध्ये दौरे करुन नारायण राणे सध्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. चार नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आपली पूर्ण ताकद दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यासाठी संपूर्ण जिल्हा राणे पितापुत्रांनी सध्या पिंजून काढलाय.

पाहा व्हिडीओ – 

इतर राजकीय बातम्या – 

Video : ‘आम्ही विकासाचा नारळ फोडला, पण तुम्ही तर…’, शिवेंद्रराजेंच्या टिकेला उदयनराजेंचं प्रत्त्युत्तर

राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, मोदी साहेबांनाही धोका होऊ शकतो: दीपक केसरकर

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.