Deepak Kesarkar : राष्ट्रवादीवर टीका, पवारांबाबत दिलगिरी, राणेंवर मात्र रागच, केसरकरांची 3 मोठी वक्तव्य

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील राजकीय मतभेद हे काही महाराष्ट्राला नवे नाहीत. राष्ट्रवादीत असताना त्यांना नारायन राणे यांचा प्रचार करण्यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र, केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला पण राणेंच्या व्यासपीठावर गेले नाहीत. त्याच दरम्यान, शरद पवारांकडे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता भाजपा आणि शिंदे गट एकत्र आल्याने कोकणात राजकीय परस्थिती काय होणार हे पहावे लागणार आहे.

Deepak Kesarkar : राष्ट्रवादीवर टीका, पवारांबाबत दिलगिरी, राणेंवर मात्र रागच, केसरकरांची 3 मोठी वक्तव्य
शरद पवार आणि दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 1:04 PM

मुंबई :  (Deepak Kesarkar) आ. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते झाल्यापासून चांगलेच चर्चेत राहिलेले आहेत. वेळोवेळी त्यांनी (Eknath Shinde) शिंदे गटाचे आणि शिवसेनेचे कसे जुळवून घेता येईल याबाबत अनेक वेळा वक्तव्य ही केली आहेत. मात्र, बंडाचे कारण सांगताना त्यांनी कायम राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमुळेच ही वेळ आल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीवर कायम टीका करणारे दीपक केसरकर हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार यांच्या बद्दल किती आदर आहे हेच आज माध्यमासमोर पटवून सांगत होते. आतापर्यंत शरद पवारांबद्दल एकही अपशब्द केलेला नाही. आतापर्यंत केवळ घडलेल्या घटनांचा उहापोह करण्यात आला होता. चुकीचे वाक्य कधीच नाही. मात्र, असे घडले असले तरी जाहीर दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. शिवाय राणेंचा आपण कधीच प्रचार करु शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर वेळ निघून जाण्यापूर्वी शिवसेना पक्ष प्रमुखांना निर्णय घ्यावा याचाही त्यांनी पुन्नउच्चार केला आहे.

पवारांची जाहीर दिलगिरी

बंडाच्या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच ही वेळ आल्याचे सांगणारे दीपक केसरकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाय ते एक ज्येष्ठ नेते असून माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचेही केसरकर म्हणाले आहेत. यापूर्वीही बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत हे पाऊल उचलल्याचे सांगितले. तर विधानसभेत याच आमदारांनी अजित पवार यांच्या कर्याचे कौतुकही केले होते. त्यामुळे केसरकर यांच्या वक्तव्यामागे अदृश्य शक्ती तर नाही ना असाच सवाल उपस्थित होत आहे.

राणेंना मात्र कायम विरोध

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील राजकीय मतभेद हे काही महाराष्ट्राला नवे नाहीत. राष्ट्रवादीत असताना त्यांना नारायन राणे यांचा प्रचार करण्यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र, केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला पण राणेंच्या व्यासपीठावर गेले नाहीत. त्याच दरम्यान, शरद पवारांकडे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता भाजपा आणि शिंदे गट एकत्र आल्याने कोकणात राजकीय परस्थिती काय होणार हे पहावे लागणार आहे. मध्यंतरीच नितेश राणे यांनी केसरकरांना सल्ला दिलेला आहे. त्यामुळे आगामी काळात एकत्र काम करण्याची गरज निर्माण झाली तर थेट नारायण राणे यांच्याशी आपला संवाद असेल असे केसरकर म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेबाबत अजूनही आशादायी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे. वेळ निघून गेल्यावर पुन्हा काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या अनुशंगाने ठाकरे यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे. आता केवळ शिंदे गटाचा निर्णय असे नाही तर यामध्ये भाजपही सहभागी झाले आहे. त्यामुळे असाच वेळ गेला तर भविष्यात काय होईल याला कोणीच आडवू शकणार नसल्याचेही केसरकर यांनी सांगितले आहे. वेळ वाया घालवू नका निर्णय घ्या असेच त्यांना यातून म्हणायचे असल्याचा अर्थ काढला जात आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.