AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे दाम्पत्यामुळे महाविकास आघाडीत एकी, यशोमती ठाकूर यांची स्तुतिसुमनं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीत एकी असल्याचे म्हणाल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांना एकप्रकारे आधार दिला आहे.

ठाकरे दाम्पत्यामुळे महाविकास आघाडीत एकी, यशोमती ठाकूर यांची स्तुतिसुमनं
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 2:39 PM

मुंबई – भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना जेलमध्ये पाठवणार असल्याचे सुध्दा ते म्हणाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावरती सुध्दा आरोप केला आहे, त्यांच्या पत्नीच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचे त्यांनी मिडीयाला सांगितले आहे. तेव्हापासून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या एकमेकांवरती रोज आरोप करताना दिसत आहेत. या आरोपात तथ्य नसून किरीट सोमय्या खोटं बोलत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीत एकी असल्याचे विधान यशोमती ठाकूर यांनी केल्यामुळे त्यांच्या विधानाची मोठी चर्चा राजकारणात सुरू झाली आहे. कारण काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर या वेळोवेळी भाजपाच्या राजकारणावरती टीका करीत असतात. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप खरे नसून भाजपाला दुस-याची बदनामी करण्याची अशी सवय असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.

उद्या सरपंचावरही ईडी लावतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीत एकी असल्याचे म्हणाल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांना एकप्रकारे आधार दिला आहे. तसेच त्यांनी भाजपवरती टीका करताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या संचालकांवर ईडी लावली होती. पंरतु तिथं सुध्दा आमची बदनामी करून देखील आमचा विजय झाला. कारण आम्ही तिथं कसल्याही प्रकारचा घोटाळा केला नव्हता. त्याचबरोबर एखाद्या प्रकणावरवरती ईडीची चौकशी लावायची आणि मते फिरवायची सवय भाजपाला आहे असंही काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत आम्ही घाबरणार नाही. आमच्यावरती भाजपाने कितीही संकट निर्माण केली तरी आम्ही त्याला सामोरे जाऊ असं देखील त्या म्हणाल्या आहेत. उद्या सरपंचावरती ईडी लावली म्हणजे आच्छर्य वाटायला नको असाही विनोद त्यांनी केला.

महाराष्ट्र राजकारण तापलं

किरीट सोमय्या आणि संजय राऊत मागील अनेक दिवसांपासून एकमेकांवरती भ्रष्टाचार केल्याचे सांगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण अधिक गरम झालं आहे. तसंच नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची बदनामी केल्याच्या निशेधार्थ काँग्रेस रस्त्यावरती उतरून आंदोलन करीत आहे. तसेच काँग्रेसकडून मुंबईतल्या अनेक भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन केलं आहे. आज मुलुंडमध्ये भाजपचे नेते मनोज कोटक यांच्या घरासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याने भाजपचे कार्यकर्ते तिथे आगोदर जमल्याचे पाहायला मिळाले.

Fifth fodder scam case: लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षाची शिक्षा, डोरंडा कोषागार घोटाळ्या प्रकरणी कोर्टाचा निर्णय

‘कसौटी’च्या अनुरागला 44 व्या वर्षीं ‘प्रेरणा’ सापडली, सिजेन खानचं बिर्याणीवालं प्रपोज कसं ठरलं हिट?

IND VS WI: सूर्यकुमारने मैदानावरच हात जोडून राहुल द्रविड यांना केला नमस्कार, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.