Prakash Ambedkar : अचानक छातीत दुखू लागल्याने प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल

Prakash Ambedkar : काल अचानक छातीत दुखू लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे. राजकारणातील प्रमुख पक्षांनी तिकीट नाकारल्यानंतर अनेक नेते वंचितकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवत असल्याच दिसून आलय.

Prakash Ambedkar : अचानक छातीत दुखू लागल्याने प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल
Prakash-Ambedkar
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 1:00 PM

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.

पुढील 3 ते 5 दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या  निरीक्षणात राहणार आहेत. वंचित सोशल मीडिया पेजवरुन ही अधिकृत माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

वंचितची चर्चा आहे, कारण….

वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे. राजकारणातील प्रमुख पक्षांनी तिकीट नाकारल्यानंतर अनेक नेते वंचितकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवत असल्याच दिसून आलय. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. 2019 च्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी चांगली मत मिळवली. त्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यामुळेच वंचितची बरीच चर्चा झाली. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला तो करिष्मा करुन दाखवता आला नाही. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि मुख्य चेहरा आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.